1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची?
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार होण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, प्रत्येकालाच कार खरेदी करताना संपूर्ण रक्कम भरता येत नाही. अशावेळी, अनेक जण कार लोनचा पर्याय घेतात. मात्र, कोणत्या कंपनीची कार खरेदी करावी असा देखील प्रश्न अनेक जणांना सतावत असतो.
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. कंपनीने ग्राहकांच्या सोयीनुसार चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. Tata Punch ही त्यातीलच एक कार.
टाटा पंच ही भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्हीपैकी एक आहे. या कारचे एकूण 31 व्हेरिएंट बाजारात आहेत, ज्याची किंमत 6.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.32 लाख रुपयांपर्यंत जाते. या टाटा कारचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल अॅडव्हेंचर Rhythm (पेट्रोल) आहे. पंचच्या या व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 8.52 लाख रुपये आहे.
Honda एका मागोमाग एक अशा 5 पॉवरफुल कार लाँच करण्याच्या तयारीत, EV सोबतच Hybrid Car वर जास्त लक्ष
टाटा पंचचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 7.67 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. कार लोनची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त रक्कमेचे कर्ज मिळू शकते. पंच खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर बँक व्याज आकारते. या व्याजानुसार, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम ईएमआय म्हणून जमा करावी लागेल.
टाटा पंच खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 85 हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. जर तुम्ही ही टाटा कार खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे 19 हजार रुपये EMI जमा करावा लागेल.
बाबो ! रस्त्यावर दिसली दुमजली इमारती एवढी भल्ली मोठी कार, फक्त एका टायरची किंमत 21 लाख रुपये
जर तुम्ही टाटा पंच खरेदी करण्यासाठी 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बँकेत दरमहा 16 हजार रुपये EMI जमा करावे लागतील.
जर तुम्ही ही 5 सीटर कार खरेदी करण्यासाठी 6 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बँकेत 13,800 रुपये EMI जमा करावे लागतील. जर तुम्ही टाटा पंच खरेदी करण्यासाठी 7 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा 12,400 रुपये बँकेत जमा करावे लागतील.