फोटो सौजन्य: Social Media
वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे हल्ली अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहे. यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना खासकरून स्कूटर आणि बाईक्सची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज सुद्धा आपल्याला ई व्हेइकल्स मार्केटमध्ये आणण्यास तयार आहेत.
जेव्हा आपण स्कूटरविषयी बोलतो, तेव्हा आपसूकच आपल्या डोळ्यासमोर होंडा कंपनीची अॅक्टिव्हा स्कूटर उभी राहते. होंडाच्या अॅक्टिव्हाला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे कंपनीने या स्कूटरचे 2G 3G 4G असे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. आता कंपनी याचा अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
Honda Motorcycle and Scooter India येत्या 27 नोव्हेंबरला आपली ‘पहिली इलेक्ट्रिक स्कूटर’ भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. यासाठी माध्यमांना निमंत्रणही देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारीमध्ये होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये जागतिक स्तरावर डेब्यू करू शकते अशीही बातमी आहे.
अशा परिस्थितीत, ॲक्टिव्हा ईव्ही ही ऑटोमोबाईल विश्वातील सर्वात चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटर Activa चे EV व्हर्जन असेल असे कंपनीने अद्याप तरी सांगितलेले नाही. पण बहुतेक बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत की ते जवळजवळ नक्कीच Activa EV असणार आहे.
सध्या, या इलेक्ट्रिक टू-व्हीलर व्हेइकलबद्दल तपशील उपलब्ध नाहीत, परंतु कंपनीने सांगितले की स्कूटरचा परफॉर्मन्स त्याच्या 110cc ICE सारखी असेल. हे Activa 110 चे इलेक्ट्रिक व्हेरियंट म्हणून लाँच केले जाईल अशी अपेक्षा आहे. चला या इलेक्ट्रिक स्कूटरची संभाव्य किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.
Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 ते 150 किलोमीटरची रेंज देऊ शकते. एवढेच नाही तर, Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्णपणे डिजिटल टचस्क्रीन इंस्ट्रुमेंटल कन्सोल, कीलेस स्टार्ट आणि स्टॉप सारखे फीचर्स देखील मिळू शकतात. जर आपण या स्कूटरच्या एक्स शोरूम किंमतीबद्दल बोललो तर याची किंमत 1 ते 1.20 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
या स्कॉउटरची विक्री 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व प्रथम ते भारतीय बाजारपेठेत लाँच केले जाईल. त्यानंतर कंपनी इंडोनेशिया, जपान आणि युरोपियन देशांमध्ये ही स्कूटर लाँच करू शकते. भारतीय बाजारपेठेत लाँच झाल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ आणखी वाढण्याची शक्यता आहे.