फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही तुमची नवीन बाईक 80-100 km/h वेगाने चालवून त्याचा आनंद घेत असाल, तर हे तुमच्या बाईकच्या इंजिनसाठी हानिकारक ठरू शकते. सुरुवातीला नवीन बाईक जास्त वेगाने चालवल्याने इंजिनचे नुकसान तर होतेच, पण त्याचा बाईकच्या परफॉर्मन्सवर आणि आयुष्यावरही परिणाम होतो. सुरुवातीला नवीन बाईक जास्त वेगाने का चालवू नये आणि ती का टाळणे महत्त्वाचे आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
नवीन बाईक खरेदी केल्यानंतर, सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्याचा “रनिंग-इन पिरियड”, जो सहसा पहिल्या 2000 किलोमीटरपर्यंत असतो. या काळात, इंजिन, गिअरबॉक्स आणि बाईकचे इतर महत्त्वाचे पार्ट सेट होत असतात. जर तुम्ही वेगाने बाईक चालवून या प्रक्रियेत व्यत्यय आणला तर त्यांचे आयुष्य आणि परफॉर्मन्स दोन्ही कमी होते.
बजाज सारख्या कंपन्या सल्ला देतात की पहिल्या 1000 किलोमीटरसाठी तुमच्या बाईकचा स्पीड 45 किमी/तास पेक्षा जास्त नसावा. यानंतर, पुढील 1000 किमीसाठी 55 किमी/ताशी पेक्षा जास्त स्पीड घेऊ नये. याचा अर्थ असा की सुरुवातीला जास्त वेगाने बाईक चालवणे इंजिनसाठी हानिकारक ठरू शकते. इंजिन जास्त गरम होणे, झीज होणे, परफॉर्मन्समध्ये आणि मायलेजमध्ये घट – हे सर्व सुरुवातीच्या स्पीड लिमिटकडे दुर्लक्ष केल्यामुळे होऊ शकते.
नवीन बाईक खरेदी केल्यानंतर, पहिल्या 1000 किमी दरम्यान गिअरनुसार स्पीड लिमिट लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, बजाज पल्सर 150 च्या बाबतीत, कंपनी सल्ला देते की पहिल्या 1000 किमीसाठी, पहिल्या गिअरमध्ये कमाल वेग 10 किमी/तास, दुसऱ्या गिअरमध्ये 20 किमी/तास, तिसऱ्या गिअरमध्ये 30 किमी/तास, चौथ्या गिअरमध्ये 35 किमी/तास आणि पाचव्या गिअरमध्ये 45 किमी/तास असा राखला पाहिजे. जेव्हा बाईक 1000 ते 2000 किमी दरम्यान असते, तेव्हा ही मर्यादा थोडी वाढते.
या काळात, पहिल्या गिअरमध्ये जास्तीत जास्त वेग 15 किमी/तास, दुसऱ्या गिअरमध्ये 30 किमी/तास, तिसऱ्या गिअरमध्ये 40 किमी/तास, चौथ्या गिअरमध्ये 45 किमी/तास आणि पाचव्या गिअरमध्ये 55 किमी/तास असावा. स्पीड आणि गिअरचा हा समन्वय इंजिनला त्याच्या कंपोनंट्सशी योग्यरित्या समन्वय साधण्यास मदत करतो आणि बाईकची कार्यक्षमता बराच काळ टिकते.
आता Xiaomi चे मोबाईलच नाही तर कार सुद्धा मार्केट गाजवणार, भारतात होणार लाँच?
एक अतिशय सामान्य चूक म्हणजे बाईक सुरू होताच काही जण ती हाय स्पीडने चालवत असतात. प्रत्यक्षात, इंजिन सुरू होताच त्याला वेळ लागतो जेणेकरून इंजिन ऑइल संपूर्ण इंजिनमध्ये योग्यरित्या पसरू शकेल आणि सर्व पार्ट्सपर्यंत पोहोचू शकेल. जर असे झाले नाही तर लुब्रिकेशन योग्यरित्या होत नाही आणि त्यामुळे इंजिनच्या पार्ट्सची झीज लवकर सुरू होतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही बाईक सुरू करता तेव्हा ती कमीत कमी 1 मिनिटासाठी थ्रॉटल न देता उभी राहू द्या जेणेकरून इंजिन ऑइलचे सर्क्युलेशन पूर्ण होईल आणि बाईक बराच काळ सुरळीत आणि सुरक्षितपणे चालेल.