फोटो सौजन्य: @MahindraXUV3XO (X.com)
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये कंपन्या कार ऑफर करत असतात. मात्र, जेव्हा विषय एसयूव्हीचा कारचा असतो, तेव्हा एकाच कंपनीचे नाव आठवते, ते म्हणजे महिंद्राचे. देशात या ऑटो कंपनीने जबरदस्त लूक आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. यातही कंपनीने फ्यूचरिस्टिक डिझाइन असणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या, ज्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
महिंद्राने अलीकडेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केलेल्या XUV 3XO चा Revx व्हेरिएंट लाँच केला आहे. आता ही एसयूव्ही सर्वोत्तम ऑडिओ सिस्टम Dolby Atmos सह लाँच करण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात ही कार कोणत्या किंमतीत आणि कोणत्या व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
नवीन Renault Kiger चा टिझर रिलीज, ‘हे’ नवीन फीचर्स मिळू शकतात पाहायला?
महिंद्राने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केलेली XUV 3XO RevX A लाँच केली आहे, जी डॉल्बी अॅटमॉससह नवीन सहा-स्पीकर ऑडिओ सिस्टमसह अपडेट केली आहे.
महिंद्राने माहिती दिली आहे की या फीचरसह तीन व्हेरिएंट देण्यात आले आहेत. यामध्ये AX5L, AX7 आणि AX7L यांचा समावेश आहे.
महिंद्राच्या डॉल्बी अॅटमॉस फीचरमुळे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान चांगली ऑडिओ सिस्टम पाहायला मिळेल. ज्यामुळे प्रवासाची मजा द्विगुणित होईल. हे फीचर मूळतः सिनेमाप्रेमींसाठी विकसित करण्यात आले होते. परंतु, आता कारमध्ये चांगल्या फीचर्सची उपलब्धता असल्याने, हे फीचर अनेक कारमध्ये देखील दिले जात आहे. महिंद्राची ही चौथी कार आहे ज्यामध्ये हे फीचर देण्यात आले आहे.
35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर टर्बो इंजिन असून ते पेट्रोल व डिझेलसोबतच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांत उपलब्ध आहे.
कंपनीने माहिती दिली आहे की 12 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत या फीचर्ससह येणारी ही जगातील पहिली एसयूव्ही आहे. डॉल्बी अॅटमॉससह येणाऱ्या एसयूव्ही व्हेरिएंटची डिलिव्हरी सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होईल.
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा XUV 3XO देण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार Maruti Suzuki Breeza, Kia Sonet, Kia Syros, Tata Nexon, Renault Kiger, Nissan Magnite, Skoda Kylaq, आणि Hyundai Venue सारख्या एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.