फोटो सौजन्य: wikipedia
भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या बेस्ट कार ऑफर करत आहे. मात्र, बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या वाहन कंपन्यांकडून असणाऱ्या अपेक्षा बदलत आहे. म्हणूनच अनेक ऑटो कंपन्या बदलत्या काळानुसार त्यांच्या विद्यमान मॉडेलमध्ये अनेक बदल करत आहेत.या वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नुकतेच रेनॉल्टने त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Kiger च्या 2025 मॉडेलचा टीझर रिलीज केला आहे. या टिझरवरून असे दिसून येते की कंपनीने या कारमध्ये मोठे बदल करण्याऐवजी विद्यमान डिझाइन आणि फीचर्समध्ये सुधारणा करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. ही कार कोणत्या खास फीचर्ससह आणली जाईल ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?
या कारच्या टीझरमध्ये नवीन लाईम ग्रीन पेंट शेड पाहायला मिळाली आहे. कंपनीचा नवीन 2डी डायमंड लोगो देखील त्याच्या पुढच्या भागात दिसत आहे. रेनॉल्ट ट्रायबर प्रमाणे, यात नवीन डिझाइन केलेले ग्रिल, नवीन बंपर, हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएल स्ट्रिप मिळू शकते. मागील बाजूस, नवीन एलईडी टेल लॅम्पसह सी-आकाराचे टेल लाइट्स देखील दिले जाऊ शकतात.
यामध्ये सॉफ्ट-टच मटेरियलसह नवी अपहोल्स्ट्री टोन दिली जाऊ शकते. डॅशबोर्डच्या लेआउटमध्येही काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. नवीन फीचर्स म्हणून -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिला जाऊ शकतो, जो वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह उपलब्ध असेल. याशिवाय, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी फीचर्स देण्यात येऊ शकतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंट्समध्ये 6एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात मिळू शकतात.
ही कार दोन इंजिन पर्यायांसह येऊ शकते. यात 1.0-लीटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. हे इंजिन मॅन्युअल, एएमटी (AMT) आणि सीव्हीटी (CVT) ट्रान्समिशन ऑप्शनसह दिले जाऊ शकतात.
नवीन Renault Kiger ची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित जास्त असू शकते. याची सुरुवातीची किंमत सुमारे 6.2 लाख रुपये असून, टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत जवळपास 11.5 लाख रुपये असू शकते. भारतीय बाजारपेठेत या कारचा सामना Maruti Suzuki Brezza, Tata Nexon, Hyundai Venue आणि Kia Sonet यांसारख्या कार्सशी होतो.