फोटो सौजन्य: iStock
देशात मोठ्या प्रमाणात एसयूव्ही कार्स विकल्या जातात. तसेच या कार्सची क्रेझ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सेलिब्रेटीजपासून ते नेते मंडळीपर्यंत, अनेक जण एसयूव्ही कार्स वापरताना दिसतात. याचे कारण म्हणजे या कार्स फक्त दिसण्यात आकर्षक नसून परफॉर्मन्समध्ये सुद्धा पॉवरफुल असतात. म्हणूनच प्रत्येक ऑटो कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा कार लाँच करत असते.
भारतात तसे अनेक ऑटो कंपनीज आहेत, ज्या एसयूव्ही मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. पण नुकतेच ऑक्टोबर 2024 मधील ऑटो सेल्स रिपोर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यातून आपल्याला समजू शकते की कोणत्या कंपनीच्या एसयूव्हीने मार्केटमध्ये आपली पक्कड ठेवली आहे.
Mahindra Scorpio Classic आणि Mahindra Scorpio N हे भारतातील आघाडीच्या SUV उत्पादक महिंद्राने 7 सीटर SUV सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये या SUV च्या एकूण 15677 युनिट्सची विक्री झाली आहे.
महिंद्राची अजून एक एसयूव्ही या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 700 ही 7 सीटर SUV सेगमेंटमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्ससह ऑफर करण्यात येते. गेल्या महिन्यात देशभरातून या एसयूव्हीच्या एकूण 10435 युनिट्सची खरेदी करण्यात आली होती.
महिंद्राची बोलेरो एसयूव्हीही ७ सीटर एसयूव्हीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. या एसयूव्हीला देशातील ग्रामीण भागात चांगली पसंती मिळत आहे. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या एकूण युनिट्सची विक्री 9849 इतकी झाली होती.
जपानी ऑटोमेकर टोयोटा कंपनी भारतात अनेक उत्तम कार्स ऑफर करत असते. कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्युनर ही सात-सीट पर्यायमध्ये ऑफर केली जाते. फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या एसयूव्हीलाही भारतात खूप पसंती मिळाली आहे. गेल्या महिनाभरात 3684 लोकांनी ही SUV खरेदी केली आहे. यासोबतच टोयोटा फॉर्च्युनरचाही टॉप-5 SUV च्या यादीत समावेश झाला आहे.
Hyundai Alcazar ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात, लोकांनी या एसयूव्हीच्या 2204 युनिट्स खरेदी केल्या होत्या. कंपनीने नुकतीच ही SUV अनेक उत्तम फीचर्स आणि डिझाइन बदलांसह बाजारात आणली आहे.
वरील सेव्हन सीटर एसयूव्हीच्या यादीत समाविष्ट असलेल्या पाचही एसयूव्ही ग्राहकांनी खूप पसंत केल्या आहेत. गेल्या महिन्यात या पाचही एसयूव्हींची एकूण विक्री 41849 युनिट्स होती.