फोटो सौजन्य: iStock
सध्या भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करतात. हल्ली ग्राहक कार खरेदी करताना त्याच्यातील सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा लक्ष देत असतात. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक कार उत्पादक कंपन्या 5 स्टार सेफ्टी रेटिंग असणाऱ्या कार ऑफर करत असतात. मात्र, याच सोबतीने अनेक जण अजून सुरक्षित ड्रायव्हिंग म्हणून डॅशकॅम सुद्धा बसवतात.
लोकं अनेकदा कारमध्ये विविध ॲक्सेसरीज बसवतात. अशीच एक आवश्यक ॲक्सेसरी म्हणजे डॅशकॅम, जी रस्त्यावर कार सुरक्षित ठेवण्यास मदत करतेच, शिवाय प्रवाश्यांचे संरक्षणही होते. चला डॅशकॅमबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
धमाकेदार फीचर्स आणि तितकंच पॉवरफुल इंजिन! ‘या’ कारची बुकिंग उद्यापासून सुरु
डॅशकॅमच्या नावाप्रमाणेच, ते तुमच्या कारमध्ये ॲक्सेसरी म्हणून इन्स्टॉल केले जाऊ शकते. हा एक प्रकारचा कॅमेरा आहे जो कारच्या डॅशबोर्ड किंवा विंडशील्डवर सहजपणे बसवता येतो. तो प्रवास करताना व्हिसिबिलीटी रेकॉर्ड करतो, ज्यामुळे अपघात झाल्यास ड्रायव्हरसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरतो.
कार चालवताना अपघात झाल्यास स्वतःला निर्दोष सिद्ध करणे खूप कठीण असते. अशा वेळी डॅशकॅम (Dashcam) उपयोगी ठरतो. तो सहजपणे कारमध्ये बसवता येतो आणि प्रवासादरम्यान सर्व रेकॉर्डिंग करतो, ज्यामुळे अपघाताच्या प्रसंगी पुरावा मिळवणे सोपे होते.
जर तुम्ही तुमच्या कारसाठी डॅशकॅम खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारचे डॅशकॅम उपलब्ध आहेत, परंतु उत्तम क्वालिटी, मोठी बॅटरी क्षमता आणि जास्त स्टोरेज असलेला डॅशकॅम सर्वाधिक उपयुक्त ठरतो.
उच्च दर्जाच्या रेकॉर्डिंगमुळे इतर वाहनांची माहिती ओळखणे सोपे होते, तसेच जास्त स्टोरेज असल्याने जुन्या व्हिडिओ रेकॉर्डिंग्सही पाहता येतात. त्यामुळे डॅशकॅम केवळ सुरक्षेसाठी नव्हे, तर आवश्यक पुरावा साठवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन
डॅशकॅम बाजारात विविध फीचर्ससह येतात. मात्र, वायरलेस कनेक्टिव्हिटी, जीपीएस आणि डिस्प्ले असलेले वापरण्यास खूप सोपे आहेत.
डॅशकॅम त्यांच्या क्वालिटी आणि फीचर्सनुसार विविध कंपन्यांकडून उपलब्ध आहेत. याची ऑनलाइन किंमती आणि बाजारात सुमारे 2 ते 3 हजारांपासून रुपयांपासून सुरू होतात. तसेच फीचर्स वाढल्याने डॅशकॅमची किंमत सुद्धा वाढते.