Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात? ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ हा विषय या मंत्रालयाच्या पूर्णपणे अंतर्गत का येत ना

भारताचे पेट्रोलियम मंत्रालय देशात इंधनाचा पुरवठा आणि शुद्धीकरण सांभाळते, परंतु इथेनॉलचा उगम शेती आणि जैवइंधनाशी संबंधित असल्याने हा विषय आंतर-मंत्रालयीन कक्षेत येतो. हे मंत्रालय थेट इथेनॉल उत्पादन करत नसून, केवळ तेल कंपन्यांमार्फत त्याची खरेदी आणि पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे काम करते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 15, 2026 | 05:16 PM
भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात? ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ हा विषय या मंत्रालयाच्या पूर्णपणे अंतर्गत का येत ना
Follow Us
Follow Us:

भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आणि इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही या मंत्रालयाची मुख्य जबाबदारी आहे. त्याचबरोबर हल्लीच्या दिवसांत चाललेले इथेनॉल ब्लेंडिंग विषयाचे वारेही या मंत्रालयाच्या संपूर्णपणे अंतर्गत येत नाहीत. सहसा लोकांना वाटू शकते इथेनॉल हे पेट्रोल मध्ये मिसळण्याचे असल्याने हा विषय पेट्रोलियम मंत्रालयाकडे येत असावा, पण इतर अनेक कारणांमुळे ते शक्य नसते. याची कारणे समजून घेऊयात आणि पेट्रोलियम मंत्रायाची कामे ही समजून घेऊयात.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रमुख भूमिका आणि जबाबदाऱ्या

अन्वेषण आणि उत्पादन (Exploration & Production)-  देशांतर्गत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेणे आणि त्यांचे उत्पादन वाढवणे.

शुद्धीकरण आणि पुरवठा- आयात केलेल्या किंवा देशात उत्पादित झालेल्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करणे आणि पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी चा पुरवठा देशभरात सुरळीत ठेवणे.

किंमत नियंत्रण आणि धोरणे – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार इंधनाच्या किमतींवर देखरेख ठेवणे आणि ग्राहकांसाठी उज्ज्वला योजनेसारख्या कल्याणकारी योजना राबवणे.

परकीय गुंतवणूक आणि करार- भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी परदेशी तेल कंपन्यांशी करार करणे.

यासाठी पेट्रोलियम मंत्री नाही तर,नितीन गडकरी बोलतात ‘इथेनॉल ब्लेंडिंगच्या’ विषयांबद्दल!गडकरींच्या मुलाखतीतील हे वक्तव्य जाणून घ्या

इथेनॉल ब्लेंडिंग हा विषय पूर्णपणे या मंत्रालयाच्या अंतर्गत का येत नाही?

अनेकदा लोकांना वाटते की इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते, त्यामुळे हा विषय पूर्णपणे पेट्रोलियम मंत्रालयाचा असावा. पण प्रत्यक्षात तसे नाही. हा एक आंतर-मंत्रालयीन विषय आहे. याचे कारण असे की,

१.कच्चा माल आणि निर्मिती -कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय

इथेनॉल हे खनिज तेल नाही; ते प्रामुख्याने ऊस, मका आणि खराब झालेल्या धान्यापासून बनवले जाते. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन, उसाचे दर आणि शेतकऱ्यांशी संबंधित धोरणे ही कृषी मंत्रालय आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या कक्षेत येतात.

Nitin Gadkari Interview: इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होते? नितीन गडकरींचे विरोधकांना प्रत्युत्तर

२.राष्ट्रीय धोरण- नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

इथेनॉल हे जैवइंधन असल्याने ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण’ हे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे तयार केले जाते.

पेट्रोलियम मंत्रालयाची भूमिका मर्यादित का आहे?

पेट्रोलियम मंत्रालयाचे काम फक्त तयार झालेले इथेनॉल तेल कंपन्यांमार्फत खरेदी करणे आणि ते पेट्रोलमध्ये १०% किंवा २०% मिसळून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे एवढेच आहे. म्हणजेच, पेट्रोलियम मंत्रालय हे इथेनॉलचे उत्पादक नसून केवळ ग्राहक आणि वितरक आहे.

एकंदरीत, इथेनॉल ब्लेंडिंग हा देशाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याचा उगम कृषीक्षेत्रातून होतो, धोरण नवीकरणीय ऊर्जेचे असते आणि शेवटचा टप्पा म्हणजे वितरण पेट्रोलियम मंत्रालयाकडे असतो. म्हणूनच हा विषय एकट्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नाही.

Web Title: Why ethanol blending is not a responsibility of petroliun ministry auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित
1

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास
2

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी
3

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी

बाईक प्रेमींसाठी धमाका! नवीन Jawa 42  च्या लाँचने उत्सव सिजनची दणक्यात सुरुवात; जाणून घ्या काय आहे खास?
4

बाईक प्रेमींसाठी धमाका! नवीन Jawa 42 च्या लाँचने उत्सव सिजनची दणक्यात सुरुवात; जाणून घ्या काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.