
Chery-या चायनीज ऑटोकंपनीने आपल्या iCar ब्रँडने आपल्या ऑफ-रोड SUV सेगमेंटचा विस्तार करत नवीन iCar V25 सादर केली आहे. ही नवीन हायब्रिड SUV कॉम्पॅक्ट V23 आणि फ्लॅगशिप V27 च्या दरम्यान पोझिशन करण्यात आली असून, यात REEV तंत्रज्ञान, मोठा आकार, LiDAR सपोर्ट आणि तब्बल १,८०० किलो वजन खेचण्याची क्षमता मिळते. जिथे भारतात महिंद्रा थार सारख्या ऑफ रोडींग गाड्यांचा बोलबाला आहे; तिथे ही icar V25 या भारतात स्थित ऑफ रोडींग कारला टक्कर देईल, असे भाकीत वर्तवले जात आहे.
भारतात येण्याची शक्यता आणि स्पर्धा
चायनीज कार निर्माता Chery ने भारतात आधीच iCar V23, Jetour T2, Jaecoo J5 आणि Jaecoo J7 सारख्या गाड्यांचे पेटंट नोंदवले आहे. भारतात या गाड्या JSW च्या स्वतंत्र उपक्रमांतर्गत लाँच होण्याची दाट शक्यता आहे, ज्याची सुरुवात या वर्षाच्या अखेरीस ‘Jetour T2’ ने होऊ शकते. यामुळे भविष्यात iCar V25 देखील भारतात दाखल होऊ शकते. भारतात आल्यास ती महिंद्रा थार आणि जीप सारख्या गाड्यांना एक प्रिमियम पर्याय म्हणून आव्हान देईल, हे नक्की.
आकर्षक डिझाईन आणि मोठा आकार
नवीन V25 ला तिचा जुना बॉक्सी लूक कायम ठेवला आहे, पण आकाराच्या बाबतीत ती पूर्वीपेक्षा बरीच मोठी झाली आहे. तिची लांबी ४,६३६ मिमी, रुंदी १,९२० मिमी, उंची १,८५५ मिमी आणि व्हीलबेस २,८२० मिमी आहे. समोरच्या भागात ‘हाफ-सर्कल’ LED DRLs सह नवीन हेडलाइट्स, नवीन रेक्टँग्युलर फ्रंट ग्रिल आणि ऑफ-रोड लुक देणारे मजबूत बंपर क्लॅडिंग देण्यात आले आहे. तसेच ग्राहकांना यात १९-इंच आणि २१-इंच अलॉय व्हील्सचे पर्याय मिळतील.
REEV इंजिन, रेंज आणि परफॉर्मन्स
पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या V23 च्या उलट, नवीन V25 मध्ये REEV (Range-Extended Electric Vehicle) सिस्टीम वापरली आहे. यात १.५-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे १५६ PS पॉवर जनरेट करते. हे इंजिन थेट चाकांना फिरवत नाही, तर ३३.६८ kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकला चार्ज करण्यासाठी ‘जनरेटर’ म्हणून काम करते आणि गाडी प्रत्यक्ष इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीनेच चालते. फक्त बॅटरीच्या जोरावर ही कार १४५ ते १५० किमी ची इलेक्ट्रिक रेंज देते आणि तिचा टॉप स्पीड १८० किमी प्रति तास आहे.
JSW MG Motor घेऊन येतेय तब्बल १००० किमी मायलेज देणारी हायब्रिड एसयूव्ही; दिवाळीत होणार धमाका
वजन खेचण्याची क्षमता आणि हाय-टेक फीचर्स
ही SUV विशेष पॅकेजसह १,८०० किलो इतके अवजड वजन सहज खेचू शकते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही कार अधिक प्रिमियम बनली असून गाडीच्या छतावर LiDAR सेन्सर बसवला आहे, जो प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स ADAS फीचर्ससाठी काम करतो. ही सिस्टीम अधिक वेगवान प्रोसेसिंगसाठी चीनच्या प्रगत Horizon Journey 6 चिप्सशी जोडलेली आहे.