काय सांगता ! Activa च्या USP सोबतच झाला मोठा गेम, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नसणार 'हा' फिचर
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसणारी इलेक्ट्रिक वाहनं. ग्राहक देखील या इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. हीच वाढती मागणी पाहून, अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करत आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिक अनेक वर्षांपासून ई स्कूटर ऑफर करत आहे. पण आता देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या होंडा अॅक्टिव्हा स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या स्कूटरचे नाव Honda eActiva असे ठेवले आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या नवीन इलेक्ट्रिक अॅक्टिव्हाच्या सर्वात मोठ्या यूएसपीमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया.
जर आपण भारतातील टू व्हीलर बाजारपेठ समजून घेतली तर एकेकाळी बजाज सुपर, बजाज चेतक, सारख्या स्कूटरने मार्केट गाजवले आहे. पण थोड्या काळानंतर हिरो बाईक्स बाजारात आल्या आणि ग्राहक स्कूटरवरून बाईक्सकडे वळले.
हिरो स्प्लेंडर आणि बजाज पल्सरने बाईक मार्केट कायमचे बदलून टाकले. पण पुन्हा ग्राहक स्कूटरकडे वळले ते म्हणजे होंडा अॅक्टिव्हामुळे.
जेव्हा जपानची होंडा मोटर्स हीरो ग्रुपपासून वेगळी झाली, तेव्हा त्यांनी बाईकऐवजी स्कूटर सेगमेंटद्वारे पुन्हा प्रवेश केला. कंपनीने होंडा अॅक्टिव्हा सारखी दमदार आणि बजेट फ्रेंडली स्कूटर बाजारात आणली. त्यात अनेक अनोखे बदल करण्यात आले जसे की ते या स्कूटरला ऑटोमॅटिक करण्यात आले, म्हणजेच गिअर्स बदलण्याचा त्रास दूर झाला. या स्कूटरमध्ये, कंपनीने पहिल्यांदाच भारतात लोकप्रिय असलेल्या ‘अंडरसीट बूट स्पेस’ची कॉन्सेप्ट सादर केली. ही सीटखालील बूट स्पेस लवकरच बाजारात अॅक्टिव्हाची यूएसपी बनली. तसेच, इतर स्पर्धकांनाही या फिचरवर काम करावे लागले. पण आता कंपनीने होंडा अॅक्टिव्हाच्या इलेक्ट्रिक व्हर्जन, होंडा ई-अॅक्टिव्हा मधून ही सीटखालील बूट स्पेस काढून टाकली आहे. यामुळे कंपनीने होंडा अॅक्टिव्हाच्या यूएसपीमध्ये बदल केला आहे.
कारसोबतच अन्य वाहनांची वाढणार सेफ्टी ! Commercial Vehicle साठी सरकारडून ‘ही’ महत्वाची सूचना जारी
कंपनीने स्वॅपेबल बॅटरी फीचरसह होंडा ई-अॅक्टिव्हा लाँच केली आहे. यामुळे, कंपनीने बूट स्पेसच्या जागी 2 स्वॅपेबल बॅटरी बसवल्या आहेत. होंडा ई-अॅक्टिव्हा लाँच करून, होंडाने स्वॅपेबल बॅटरी स्टेशन्सचे उत्पादन सुरू केले आहे. या स्वॅप करण्यायोग्य बॅटरी सहजपणे बदलता याव्यात म्हणून, कंपनीने सीटखालील बूट स्पेसला वगळले आहे.
होंडा ई अॅक्टिव्हाची किंमत 1,17,000 रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही रोड सायन्स ड्युओ पॅकसह हे स्कूटर खरेदी केले तर तुम्हाला 1,51,600 रुपये खर्च येतील.