फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये एका पेक्षा एक दमदार कार लाँच होत आहे. यातही अनेक कार या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बनवल्या जात आहे. मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून Volkswagen उत्तम फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत आहे. आता कंपनी नवीन कार आणण्याच्या तयारीत आहे.
जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी फोक्सवॅगन आता लवकरच भारतीय बाजारात एक नवीन एसयूव्ही म्हणून फोक्सवॅगन Tiguan R-Line लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वी, या एसयूव्हीचे इंजिन, पॉवर, फीचर्स आणि डिझाइनबद्दलची माहिती समोर आली आहे. या नवीन कारमध्ये किती शक्तिशाली इंजिन असेल, त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि डिझाइन दिले जाईल? ही कार कधीपर्यंत लाँच होईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मार्केटमध्ये 2025 Suzuki Avenis आणि Burgman स्कूटर लाँच, नवीन रंगासह मिळणार जबरदस्त मायलेज
भारतात लवकरच फोक्सवॅगन एक नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी एसयूव्हीच्या काही फीचर्स आणि इंजिनची माहिती समोर आली आहे.
एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या नवीन कारच्या इंजिनशी संबंधित माहिती पब्लिश केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीमध्ये दोन लिटर क्षमतेचे टीएसआय पेट्रोल इंजिन दिले जाईल. ज्यामुळे या कारला 204 पीएसची पॉवर आणि 320 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल.
इंजिनच्या माहितीसोबतच कंपनीने काही फोटोही वेबसाइटवर पब्लिश केले आहे. त्यानुसार एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येणार आहे. यात पुढील आणि मागील पार्किंग सेन्सर्स, एलईडी हेडलाइट्स, कनेक्टेड टेल लाईट्स, समोर कनेक्टेड एलईडी डीआरएल, समोर आर बॅजिंग, मोठे फ्रंट ग्रिल, साइड प्रोफाइलमध्ये आर बॅजिंग, रूफ रेल आणि शार्क फिन अँटेना दिले जातील. कारच्या आतील भागात ग्रे रंगासह ब्लॅक-ब्ल्यू थीम देखील असेल. याशिवाय, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो एसी, अँड्रॉइड ऑटो, ड्रायव्हिंग मोड्स, अॅपल कार प्ले, पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल, एडीएएस, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ड्रायव्हिंग मोड्स, एबीएस, ईबीडी, सहा एअरबॅग्ज अशी अनेक फीचर्स यात दिले जातील.
Tata Harrier च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती? डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
कंपनीने फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइनची प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही एसयूव्ही ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन डीलरशिपद्वारे प्री-बुक करता येणार आहे. ही एसयूव्ही एकूण सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये पर्सिमॉन रेड मेटॅलिक, नाईटशेड ब्लू मेटॅलिक, ग्रेनाडिला ब्लॅक मेटॅलिक, ओरिक्स व्हाइट मदर ऑफ पेरल इफेक्ट, सिप्रेसिनो ग्रीन मेटॅलिक आणि ऑयस्टर सिल्व्हर मेटॅलिक यांचा समावेश असेल.
कंपनी ही नवीन एसयूव्ही येत्या 14 एप्रिल 2025 रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच होणार आहे. ही कार टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर, एमजी ग्लोस्टर, बीएमडब्ल्यू एक्स१ सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.