Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

शाओमीने चीनमध्ये स्कायनोमॅड N70 आणि N90 SUV रेंज सादर केली आहे. EREV तंत्रज्ञानामुळे या SUVची संयुक्त रेंज तब्बल 1,705 km पर्यंत असल्याचा दावा आहे. 5-सीटरपासून मोबाइल स्टुडिओपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना मिळणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 09, 2026 | 04:48 PM
शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
Follow Us
Follow Us:
  • शाओमी स्कायनोमॅड SUV रेंजमध्ये 1,705 km पर्यंत संयुक्त रेंज देणारे EREV मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत.
  • N70 Max मध्ये AWD, 76 kWh बॅटरी आणि 505 km पर्यंत इलेक्ट्रिक रेंज मिळते.
  • N90 Max Studio मध्ये इलेक्ट्रिक रूफ, बेड, प्रोजेक्शन सिस्टम आणि आधुनिक केबिन सुविधा दिल्या आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात स्मार्टफोननंतर आता शाओमी ऑटोमोबाइल क्षेत्रातही आपली पकड मजबूत करत आहे. कंपनीने चीनमध्ये स्कायनोमॅड SUV रेंज सादर केली असून, यामध्ये N70 आणि N90 अशी मॉडेल्स आहेत. विशेष म्हणजे ही वाहने Extended Range Electric Vehicle (EREV) तंत्रज्ञानावर आधारित असून, एका चार्ज आणि इंधनाच्या संयुक्त वापरातून तब्बल 1,705 km पर्यंतची रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे.

स्कायनोमॅड रेंजमध्ये एकूण 4 व्हेरिएंट असून त्यात 5-सीटर, 7-सीटर आणि मोबाइल स्टुडिओ कॉन्फिगरेशनचा समावेश आहे. N70 Pro ची सुरुवातीची किंमत RMB 209,900 म्हणजेच सुमारे Rs. 29.66 लाख आहे. तर टॉप-स्पेक N90 Max Studio ची किंमत RMB 299,900 म्हणजे अंदाजे Rs. 42.38 लाख आहे.

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

शाओमी N70 Pro मध्ये 52 kWh LFP बॅटरी असून ती 351 km पर्यंतची CLTC इलेक्ट्रिक रेंज देते. संयुक्त रेंज 1,351 km पर्यंत असल्याचा दावा आहे. N70 Max मध्ये ड्युअल-मोटर AWD आणि 76 kWh बॅटरी मिळते. या व्हेरिएंटची इलेक्ट्रिक रेंज 505 km, तर संयुक्त रेंज 1,461 km आहे. 0 ते 100 kmph वेग पकडण्यासाठी त्याला केवळ 5.5 सेकंद लागतात.

मोठ्या N90 Max मध्ये 7-सीटर लेआउट असून त्याची लांबी 5,285 mm आणि व्हीलबेस 3,080 mm आहे. या मॉडेलमध्ये 76 kWh बॅटरी असून 464 km इलेक्ट्रिक आणि 1,705 km संयुक्त रेंज मिळते. टॉप N90 Max Studio मध्ये इलेक्ट्रिक लिफ्टिंग रूफ, झोपण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि 220V पॉवर आउटलेटसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या

फीचर्सच्या बाबतीतही स्कायनोमॅड लक्षवेधी आहे. मोठी टचस्क्रीन, मागील स्क्रीन, रेफ्रिजरेटर आणि 25-स्पीकर ऑडिओ सिस्टम यासोबत LiDAR, मिलिमीटर-वेव्ह रडार आणि NVIDIA Thor-U चिपवर आधारित ड्रायव्हिंग असिस्टन्स तंत्रज्ञान मिळते. N70 मध्ये 9 एअरबॅग्स, तर N90 Max मध्ये 12 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. सध्या ही रेंज चीनमध्ये सादर करण्यात आली असून, भारतातील लॉन्चबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Xiaomi skynomad n70 n90 suv 1705 km range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • xiaomi update

संबंधित बातम्या

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
1

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
2

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास
3

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
4

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.