फोटो सौजन्य: @BBC_TopGear (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटची व्याप्ती पाहता अनेक ऑटो कंपन्या भारतीय मार्केटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत आहे. यात विदेशी कंपन्यांचा सहभाग जास्त आहे. भारतीय ग्राहक देखील या कंपन्यांच्या कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. विशेषकरून इलेक्ट्रिक कार्सना.
तुम्ही Xiaomi कंपनीचे नाव नक्कीच ऐकले असेल. या कंपनीने भारतात कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स असणारे फोन ऑफर केले आहे. स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, ही चिनी कंपनी शाओमी इलेक्ट्रिक कार देखील ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच चीनच्या बाहेरही त्यांच्या कार ऑफर करू शकते. अशाच शाओमी भारतातही त्यांच्या कार विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकते का? आम्ही तुम्हाला या बातमीत सांगत आहोत.त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाओमी चीनमध्ये उत्तम फीचर्ससह इलेक्ट्रिक कार ऑफर करते. आता कंपनी चीनशिवाय जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या कार उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. ही माहिती शाओमीचे सीईओ लेई जून यांनी दिली आहे.
60,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर Tata Punch खरेदी केली तर किती असेल EMI?
नुकतेच चीनमध्ये Xiaomi YU7 लाँच करण्यात आली आहे. त्यानंतर, या कारला फक्त तीन मिनिटांत दोन लाख बुकिंग मिळाली आहे. तर फक्त पहिल्या तासातच जवळजवळ तीन लाख बुकिंग झाली आहे. बुकिंगसाठी CNY 20,000 (सुमारे 2.4 लाख रुपये) चे टोकन रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
Xiaomi YU7 मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 835 किमी पर्यंत चालवता येते. इलेक्ट्रिक वाहनात ऑल व्हील ड्राइव्ह, एलईडी लाईट्स, फ्लश डोअर हँडल, तीन मिनी स्क्रीन, समोर आणि मागे इन्फोटेनमेंट स्क्रीन, नप्पा लेदर, 25 स्पीकर ऑडिओ सिस्टम, 678 लिटर बूट स्पेस, फ्युचरिस्टिक इंटिरिअर असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
Xiaomi ने जुलै 2024 मध्ये त्यांची इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 सादर केली गेली आहे. त्यानंतर बेंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ही कार भारतात पहिल्यांदाच दाखवण्यात आली होती. या कारमध्ये हेड-अप डिस्प्ले, अनेक ड्रायव्हिंग मोड्स, 16.1 इंच 3K अल्ट्रा क्लियर सेंट्रल कंट्रोल स्क्रीन, 56 इंच HUD, LED लाईट्स, अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ यासह अनेक उत्तम फीचर्स देखील देण्यात आले आहेत. एका चार्जवर ही कार 800 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
कंपनीने याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु ज्या पद्धतीने सीईओंचे अलिकडेच विधान आले आहे आणि शाओमीची कार जुलै 2024 मध्येच भारतात प्रदर्शित करण्यात आली आहे. यानंतर, जेव्हा शाओमी 2027 मध्ये चीनबाहेरील अनेक देशांमध्ये आपल्या कार सादर करेल, तेव्हा भारताचाही त्यात समावेश होऊ शकतो अशी अपेक्षा आहे.