Zelio ई मोबिलिटीने 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केली Next-Gen Gracyi
भारतामध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक असलेल्या झेलिओ ई-मोबिलिटीने, त्यांच्या लोकप्रिय कमी-स्पीडच्या इलेक्ट्रिक स्कूटर ग्रेसीची बाह्यरूप बदल केलेली नवी व्हर्जन बाजारात आणली आहे. आजच्या शहरी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेली ही स्कूटर सुधारित परफॉर्मन्स, उत्कृष्ट आराम आणि विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिक व तात्पुरते कामगारांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी फीचर्स घेऊन आली आहे. या अपग्रेडेड मॉडेलमुळे झेलिओने अद्ययावत, टिकाऊ आणि सहज उपलब्ध होणारे गतिशीलता उपाय देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
नवीन ग्रेसी ई-स्कूटर प्रवाशांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तीन बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे:
ग्रेसी स्कूटरमध्ये दैनंदिन वापर अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होण्यासाठी अनेक स्मार्ट व आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात डिजिटल मीटर, कमी प्रकाशात उत्तम व्हिसिबिलीटी देणारा एलईडी हेडलॅम्प, सोयीस्कर कीलेस ड्राइव्ह, सुरक्षिततेसाठी अँटी-थेफ्ट अलार्म, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र फूटरेस्ट यांचा समावेश आहे.
ही स्कूटर पांढरा, काळा, पांढरा-काळा, पिवळा-निळा आणि काळा-लाल अशा पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.