
Apollo नवी मुंबईत ३ प्रगत रुग्णवाहिका दाखल
जीवन वाचवण्यासाठी निर्णायक ठरणारी सेवा
श्री.अरूनेश पुनेथा, पश्चिम विभागाचे-सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“रुग्णालयात आणि रुग्णालयाच्या बाहेरही आपत्कालीन सेवांची साखळी अधिक मजबूत करणे हाच आमचा नेहमीच मुख्य हेतू राहिला आहे. या प्रगत लाइफ-सपोर्ट रुग्णवाहिकांचा समावेशामुळे जीवन वाचविण्यासाठी निर्णायक ठरणार्या सुरुवातीच्या काळात रुग्णांपर्यंत सेवा पोहोचण्याची आमची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आरोग्यसेवा संस्था आणि उदार उद्योजकीय संस्था एकत्र येतात तेव्हा समाजासाठी किती मोठे काम उभे राहू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
सुश्री सुधा झिजारिया, सीएसआर ऑपरेशन्स प्रमुख, बिलियन हार्ट्स बीटिंग यांनी व्यक्त केले,“गरजूंपर्यंत मदत किती वेगाने पोहोचते, याद्वारेच आम्ही यशाचे मोजमाप करतो. या रुग्णवाहिका वैद्यकीय संकट आणि उपचार यांच्यातील महत्त्वाची दरी भरुन काढतील-रुग्णालयांपासून घरांपर्यंत, शहरांपासून समुदायांपर्यंत हे आमचे ध्येय सुनिश्चित करतील.”
प्री-हॉस्पिटल केअरचे महत्त्व अधोरेखित करताना अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्रातील आपत्कालीन विभागाचे संचालक डॉ. नितीन जगासिया म्हणाले,“जेव्हा मदतीसाठी पहिला फोन येतो तेव्हाच आपत्कालीन उपचारांची सुरुवात होते, रुग्णालयात पोहोचल्यावर नव्हे. या रुग्णवाहिका म्हणजे चालते फिरते अतिदक्षता विभाग असून त्या जीवन वाचविण्यासाठी निर्णायक ठरणार्या सुरुवातीच्या काळात तज्ज्ञांद्वारे उपचार देण्याकरिता सज्ज आहेत. या सहयोगामुळे आमची सेवा अधिक व्यापक होणार आहे तसेच वेळ वाचवण्याचे आणि जीवन वाचवण्याचे आमचे ध्येय साध्य करण्यास अधिक क्षमता मिळेल.”