Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart : फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ! ‘हे’ आहे मुख्य कारण, काय म्हणत रिपोर्ट? जाणून घ्या

फ्लिपकार्टच्या फूड अँड न्यूट्रिशन विभागात वर्षभरात ५० टक्के वाढ नोंदवली गेली असून, जेन झी आणि टियर-२ शहरांतील ग्राहकांनी त्याला मोठी चालना दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 09:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या फूड अँड न्यूट्रिशन (अन्न आणि पोषण) विभागात वर्षभरात ५० टक्के वाढ झाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते, या वाढीमागे जेन झी ग्राहक आणि टियर-२ व त्यापुढील शहरांतील ग्राहकांचा मोठा वाटा आहे. धुळे, इम्फाळ, धारवाड, उज्जैन, हुबळी, मिरगंज आणि लहरपूरसारख्या शहरांमधून आधुनिक व पोषक खाद्यपदार्थांची मागणी लक्षणीयरीत्या वाढल्याचे कंपनीने सांगितले.

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू

फ्लिपकार्ट मिनिट्स या क्विक कॉमर्स सेवेद्वारे या विभागातील एकूण मागणीपैकी २५ टक्के व्यवहार झाले, तर टियर-२ आणि त्यापुढील शहरांचा एकूण मागणीत ६५ टक्के वाटा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. आरोग्यदायी जीवनशैली, वेलनेस ट्रेंड्स, सोशल मीडियावरील रेसिपी आणि कंटेंट क्रिएटर्सच्या शिफारशींमुळे ग्राहकांची प्रीमियम व पौष्टिक उत्पादनांकडे वाढती ओढ दिसून येत आहे.

कंपनीच्या आकडेवारीनुसार, जेन झी ग्राहकांच्या मागणीत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रोटीन ओट्स, हाय-प्रोटीन पीनट बटर, प्रोटीन मुसली, गॉरमेट चॉकलेट्स आणि कोरियन फ्लेवर्ड स्नॅक्स यांसारख्या उत्पादनांना मोठी पसंती मिळत आहे. त्याचबरोबर कोल्ड-प्रेस्ड तेल, ऑलिव्ह ऑइल, अस्सल तूप, प्रीमियम ड्रायफ्रूट्स आणि खजूर यांसारख्या आरोग्यदायी उत्पादनांच्या शोधात गेल्या वर्षभरात ८० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

फ्लिपकार्टचे कन्झ्युमेबल्स विभागाचे उपाध्यक्ष निशांत दलाल यांनी सांगितले की, भारतात अन्नपदार्थ केवळ दैनंदिन गरज राहिलेली नसून ते आरोग्य, जीवनशैली आणि नव्या अनुभवांशी जोडले गेले आहेत. डिजिटल कॉमर्समुळे देशभरातील ग्राहकांना उत्तम दर्जाच्या खाद्यपदार्थांचे अधिक पर्याय उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?

दरम्यान, फ्लिपकार्ट फूड फेस्ट ३.० मध्ये ५० हून अधिक खाद्य ब्रँड्स, १,००० पेक्षा अधिक क्रिएटर्स, तसेच फराह खान, शेफ कुणाल कपूर, शेफ रणवीर ब्रार आणि इतर सेलिब्रिटी सहभागी झाले होते. ७ ते १५ जुलैदरम्यान आयोजित विशेष सेलमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स, नवीन उत्पादनांचे अनावरण आणि विविध खाद्य विभागांचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आला.

Web Title: 50 growth in flipkarts food and nutrition segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • flipkart

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
2

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
3

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.