Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Credit Card वापरणाऱ्यांनो सावधान! सुरक्षिततेसाठी ‘या’ 7 सेटिंग्ज आहेत महत्त्वाच्या

Credit Card: सोशल मीडियाचा वाढता वापर मानवी नात्यांवर परिणाम करत आहे. ऑनलाइन जगात अधिक वेळ घालवल्यामुळे कुटुंबीय आणि मित्रांसोबतचा प्रत्यक्ष संवाद कमी होऊ शकतो. यामुळे गैरसमज, संवादाचा अभाव आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 05:40 PM
Credit Card (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Credit Card (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. क्रेडिट कार्डवरील आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद ठेवा.
  2. ऑनलाइन आणि ATM व्यवहारांची लिमिट कमी करा.
  3. SMS, ईमेल अलर्ट आणि कार्ड ब्लॉक सुविधा सुरू ठेवा.

Credit Card Safety Tips:  आजच्या काळात क्रेडिट कार्डने खरेदी करणं खूप सोपं झालं. ऑनलाईन शॉपिंग, बिल भरणं आणि हॉटेल बुकिंग अशी कामं काही मिनिटात होतात. पण क्रेडिट कार्डचा वापर वाढल्यामुळे फसवणुकीचा धोकाही वाढला आहे. बऱ्याच वेळा छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमच्या कार्डमधून परवानगीशिवाय पैसे काढले जातात. अशावेळी काही महत्त्वाच्या सेटिंग्ज चालू करून तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवू शकता. Credit Card

सगळ्या व्यवहारांसाठी तुमचं क्रेडिट कार्ड 24 तास चालू असण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही त्याची सगळी फिचर्स वापरत नसाल, तर ती पेमेंट फिचर्स बंद केली पाहिजेत. व्यवहारांची लिमिट कमी केल्याने आणि या लिमिटच्या बाहेरचे व्यवहार बंद केल्याने फसवणुकीचा धोका कमी होऊ शकतो.

1. आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करा

तुम्ही परदेशात खरेदी करत नसाल तर तुमच्या कार्डवर आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद ठेवा. गरज असेल तेव्हाच चालू करा.

2. ऑनलाईन व्यवहारांसाठी लिमिट लावा

ऑनलाईन खरेदीसाठी कार्डची खर्चाची लिमिट कमी ठेवा. यामुळे फसवणूक झाली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

3. संपर्करहित पेमेंटची लिमिट तपासा

टॅप करून पेमेंट करायची सुविधा सोपी आहे. पण त्याची लिमिट नक्की ठरवा. गरज नसेल तर तुम्ही हे फिचर बंद पण करू शकता.

LPG सिलेंडर बुकिंग करताना चूक करू नका! एका लिंकवर क्लिक करताच खातं होऊ शकतं रिकामं

4. अलर्ट चालू ठेवा

प्रत्येक पेमेंटवर SMS आणि ईमेल अलर्ट चालू ठेवा. यामुळे कार्डने होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती लगेच मिळणार आहे.

5. ATM व्यवहारांवर लिमिट घाला

तुमच्या क्रेडिट कार्डवरच्या कॅश काढण्याच्या सुविधेची लिमिट कमी ठेवा किंवा गरज नसेल तर ती बंद करा.

6. कार्ड लगेच ब्लॉक करण्याची सुविधा

तुमच्या बँकेच्या मोबाईल अॅपमध्ये कार्ड ब्लॉक किंवा फ्रीझ करण्याचा पर्याय नक्की तपासा. कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तर याचा वापर करा.

Bank KYC Fraud Alert: KYC अपडेटच्या नावाखाली बँक खाते साफ! एका चुकीने गमावू शकता आयुष्यभराची कमाई, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

7. OTP आणि सुरक्षा सेटिंग्ज

OTP कोणासोबतही शेअर करू नका. तुमचा बँक अॅपचा पासवर्ड मजबूत ठेवा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा अॅडव्हान्स सुरक्षा फिचर्स चालू करा.शेवटी एकच सांगायचं, क्रेडिट कार्ड वापरणं वाईट नाही, पण ते बेसावधपणे वापरणं नक्कीच धोक्याचं आहे. या छोट्या छोट्या सेटिंग्जमुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील. आजच अॅप उघडून या सेटिंग्ज तपासा आणि गरज नसलेली फिचर्स बंद करून टाका.

Web Title: 7 credit card security settings to prevent fraud and protect money rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • ATM
  • Banking Jobs
  • Cyber security

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.