Bank KYC Fraud Alert: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बँकेत ग्राहकाला ओळखण्यासाठी गरज पडेल तेव्हा बँक KYC करायला सांगते. मुळात सुरक्षा ठेवणं हा यामागचा हेतू असतो. पण याच KYC च्या नावाने काही भामटे लोकांना लुटतायत. बँकेच्या ग्राहकांना खोटे मेसेज पाठवून त्यांना भीती दाखवून किंवा पैशांचं आमिष दाखवून लुटतायत . Bank KYC Fraud Alert:
बऱ्याचदा आपल्या मोबाईलवर बँक KYC करायचा मेसेज येतो. हा मेसेज साध्या मेसेज बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲपवर येतो. बऱ्याचदा या मेसेजची काहीच खात्री न करता काही लोक त्यात दिलेल्या खोट्या लिंकवर किंवा Apk वर क्लिक करतात आणि फसवणुकीला बळी पडतात. अशावेळी त्या बिचाऱ्या ग्राहकाचं बँक खातं काही मिनिटात रिकामं होऊ शकतं. बँकेत ठेवलेली आयुष्यभराची कमाई एका झटक्यात नाहीशी होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रत्येक बँक ग्राहकाने काळजी घेणं गरजेचं आहे. बँकेत KYC करणं तर गरजेचं आहेच, पण ते कधी करावं? कुठे करावं? आणि का करावं? याची आधी खात्री करून घेणं तितकंच गरजेचं आहे.
काही बँक ग्राहकांच्या मोबाईलवर बँक खातं बंद होईल, KYC / PAN करायची शेवटची तारीख संपली आहे किंवा रिवॉर्ड पॉईंट्स संपणार आहेत असे मेसेज येत असतात. मुळात बँक आपल्या ग्राहकांना एखादं काम करून घेण्यासाठी कधीच भीती दाखवत नाही किंवा लालच देत नाही. जर बँकेच्या नावाने आपल्या मोबाईलवर एखादा मेसेज आला आणि त्यात खातं बंद होण्याची भीती दिली असेल किंवा पैशांचा लोभ दाखवला असेल तर तो मेसेज खोटा असू शकतो. अशा खोट्या मेसेजमध्ये खोटी लिंक किंवा Apk असू शकते. भीतीने जो ग्राहक त्या लिंकवर क्लिक करतो किंवा Apk डाऊनलोड करतो त्याच्या खात्यातले पैसे गायब होण्याची भीती वाढते.
Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?
मुळात बँका आपल्या ग्राहकाकडे कधीच OTP, PIN नंबर तसेच CVV मागत नाहीत. जर एखाद्या मेसेजमध्ये या गोष्टी मागितल्या जात असतील तर ग्राहकाने लगेच सावध झालं पाहिजे, कारण तो मेसेज बँक KYC च्या नावाने ग्राहकाला लुटण्यासाठी आला आहे.
बँक ग्राहकांनी नेहमी लक्षात ठेवावं की KYC फक्त बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या अधिकृत App मधूनच करता येतं. आता Video KYC ने पण ही प्रक्रिया करता येते. यासाठी कोणताही Apk डाऊनलोड करावा लागत नाही. तसेच कोणत्याही खोट्या लिंकवर जावं लागत नाही. जर KYC ऑनलाईन करता येत नसेल तर सुरक्षेसाठी बँकेच्या शाखेत जाऊन ते पूर्ण करणं कधीही चांगलं. सध्या देशातल्या बँकांच्या अधिकृत वेबसाईट शेवटी .
खोटा मेसेज आला तर काय करावं?जर एखाद्या ग्राहकाने चुकून खोट्या मेसेजमधली लिंक उघडली किंवा त्यातला Apk डाऊनलोड झाला तर अशावेळी थेट 1930 या नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार करा. जर एखाद्या ग्राहकाला असा खोटा मेसेज आला असेल तर लगेच संबंधित बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधून तक्रार नोंदवा. हा नंबर बँक पासबुकवर मिळून जाईल.






