Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! 22-23 ऑक्टोबरच्या बैठकीकडे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचं लक्ष्य; पगारात होणार बंपर वाढ?

8th Pay Commission Meeting : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८व्या वेतन आयोगाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष्य लागून आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 20, 2026 | 03:28 PM
8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! ( सौजन्य- सोशल मीडिया )

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! ( सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 8th Pay Commission बाबत मोठी अपडेट!
  • 22-23 ऑक्टोबरच्या बैठकीकडे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचं लक्ष्य
  • पगारात होणार बंपर वाढ?
8th Pay Commission Meeting : सणासुदीच्या काळात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येईल याची कर्मचारी प्रतिक्षा करत आहे. अशातच 8th Pay Commission संदर्भात केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आठवा वेतन आयोग सध्या सल्लासमलतीच्या टप्प्यात आहे. अधिकृत शिफारशी तयार करण्यापूर्वी चर्चा सत्र सुरु आहे. या संदर्भात, आयोगाचे एक उच्चस्तरीय पॅनल या आठवड्यात 22 आणि 23 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहे. या दौऱ्यादरम्यान काही तरी मोठं घडणार असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आयोग कर्मचारी संघटना, महासंघ, निवृत्तीवेतनधारक संघटना आणि इतर प्रमुख हितधारकांसोबत प्रदीर्घ बैठका घेणार आहे. या निर्णयाकडे देशभरातील लाखो कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ( 8th Pay Commission Meeting ) 

Govt DA Hike : सरकारने घेतला मोठा निर्णय! ऑक्टोबरच्या पगारात वाढून मिळणार DA; ‘या’ तारखेपासून लागू होणार निर्णय

कोण आहेत आयोगाचे आयोगाचे अध्यक्ष?

या महत्त्वाच्या आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई भूषवत आहेत. त्यांच्यासोबत माजी आयएएस अधिकारी पंकज जैन आयोगाचे सदस्य-सचिव म्हणून आहेत, तर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आणि वित्त विषयाचे प्राध्यापक पुलक घोष हे सदस्य आहेत. आयोग वेतनश्रेणी, महागाई भत्ता DA, घरभाडे भत्ता यांसारखे भत्ते आणि कर्मचाऱ्यांच्या इतर सुविधा व लाभांमध्ये आवश्यक आणि व्यावहारिक बदल करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

मुंबईतील बैठकीचा अजेंडा काय?

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाचा हा दौरा खूप विशेष असणार आहे. आयोगाचे सदस्य केवळ बैठकांपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे विभागांना प्रत्यक्ष भेटीही देतील. कर्मचारी आणि कामगारांच्या कामाच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वे बोर्डाने ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशन AIRF आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमन NFIR यांना पाठवलेल्या पत्रानुसार, रेल्वेच्या संचालन आणि देखभालीतील विविधतेचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी मुंबई CSMT हे भेटीचे केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे. आयोगाच्या अजेंड्यावर खालील मुद्दे अग्रस्थानी आहेत.

ट्रॅक आणि सिग्नल तपासणी: आयोग ट्रॅकची देखभाल, सिग्नल कार्यप्रणाली आणि ट्रॅकवर काम करणाऱ्या देखभाल कर्मचाऱ्यांना येणाऱ्या शारीरिक अडचणी व धोक्यांचे मूल्यांकन करेल.

धावणारे कर्मचारी आणि हाय-स्पीड कॉरिडॉर: धावणाऱ्या कर्मचाऱ्यांना येणारा प्रचंड ताण आणि श्रम अनुभवण्यासाठी आयोगाचे सदस्य हाय-स्पीड कॉरिडॉरवरील लोकोमोटिव्हमधून प्रवास करतील.

नियंत्रण कक्ष आणि कार्यशाळेला भेट: नियंत्रण कक्षात रेल्वेच्या संचालनाचे नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन, स्थानकावरील कामकाज, तसेच रेल्वे कार्यशाळांमध्ये सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या देखभालीच्या कामाचे बारकाईने निरीक्षण केले जाईल.

कर्मचाऱ्यांसाठी ही भेट का महत्त्वाची?

देशभरातील रेल्वे कर्मचारी आणि इतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आशा आहे की, आयोगाच्या या थेट क्षेत्रीय भेटीमुळे त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कामाची परिस्थिती, धोके आणि अडचणी अधिक जवळून समजून घेण्यास मदत होईल. यामुळे वेतन रचना, भत्ते आणि कार्यक्षमतेबाबतच्या शिफारशींमध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, हे सुनिश्चित होईल. असा विश्वास आहे की, संघटनांसोबतच्या या बैठकांमुळे वेतन आयोगाच्या अहवालाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.

Cheap Flight Ticket Scheme : स्वस्त विमान तिकीट हवंय? आता सरकार करणार मदत; फक्त लक्षात ठेवा ‘ही’ महत्त्वाची अट

Web Title: 8th pay commission meeting on october 22 23 salary and allowance hike marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • 8th pay commission

संबंधित बातम्या

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार? कसं ते जाणून घ्या…
1

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार? कसं ते जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.