Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

केंद्र सरकारने लवकरच आधार अधिक सुरक्षित करण्याची तयारी सुरू केली आहे. UIDAI आता आधार कार्डवर तुमचं नाव किंवा पत्ता नसलेले मात्र, कार्डवर फोटो असलेला QR कोडचे कार्ड निर्माण केले जाईल. याबद्दल जाणूया सविस्तर

  • By Priti Hingane
Updated On: Nov 19, 2025 | 11:37 AM
The new Aadhaar card is coming to you

The new Aadhaar card is coming to you

Follow Us
Close
Follow Us:
  • UIDAI ची आधुनिक क्रांती
  • आधार कार्डची होणार रीडिझाइन
  • फोटो असलेल्या QR कोडमध्ये गोपनीय माहिती
 

Aadhaar Card Update News: आजच्या आधुनिक काळात आधार कार्ड सारखी डिजिटल आयडी स्वत:ची ओळख सांगायला अत्यंत महत्वाची मानली जाते. आधार कार्डवर तुमच्या सर्व सुविधा अवलंबून आहेत. परंतु, याचा गैरवापर होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. अशा महत्त्वाच्या कागदपत्राचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार कार्ड निर्माण करायचा निर्णय घेतला आहे. आधार अधिक सुरक्षित करण्यासाठी त्याचे स्वरूप बदलले जाईल. UIDAI आता आधार कार्डवर तुमचं नाव किंवा पत्ता नसेल मात्र, कार्डवर फोटो असलेला QR कोड असेल. ज्यात गोपनीय माहिती सुरक्षित राहील. आधार कार्डवर पूर्वी लिहिलेले नाव, पत्ता आणि आधार कार्ड क्रमांक काढून टाकले जाईल.

वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणी सरळ-सोपी करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्डधारकाचा फोटो आणि QR कोड असलेले आधार कार्ड जारी करण्याचा विचार करत आहे. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भुवनेश कुमार यांनी हॉटेल, विमानतळ, सुविधा संस्थांसारख्या संस्थांकडून ऑफलाइन पडताळणीला मदत तसेच, वैयक्तिक गोपनीयता राखून वय पडताळणी प्रक्रिया वाढविण्यासाठी डिसेंबरमध्ये एक नवीन नियम आणण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

कार्डवर कोणतेही अतिरिक्त तपशील आवश्यक आहे का? याचा विचार करण्यात येईल. त्याव्यातरिक्त, त्यात एक फोटो आणि QR कोड असलेले आधार कार्ड निर्माण करण्यात येईल. ज्यामुळे तुमची सर्व माहिती गोपनीय आणि अचूक राहील आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळणे शक्य होईल.

UIDAI कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी गोळा, वापरली किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तथापि, अनेक संस्था आधार कार्डच्या छायाप्रती गोळा करतात आणि साठवतात, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक माहितीची फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, सर्व आधार माहिती आता गुप्त ठेवली जात आहे, ऑफलाइन पडताळणीला प्रतिबंधित केले जात आहे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखला जात आहे.

हेही वाचा : 9 कोटी शेतकऱ्यांची आज भरणार ‘झोळी’, PM Modi देणार 2 हजार रुपयांचा 21 वा हफ्ता, यादीतून तुमचे नाव वगळले तर नाही ना?

आधार कार्ड पडताळणीचे नियम 

भारतात आधार पडताळणी धारकाच्या संमतीशिवाय करता येत नाही आणि असे करणाऱ्या कोणत्याही संस्थेला ₹1 कोटी पर्यंत दंड होऊ शकतो. ही संमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळवावी लागते, जी धारकाकडून OTP, फिंगरप्रिंट, आयरीस इत्यादीद्वारे मिळवता येते. फक्त UIDAI द्वारे अधिकृत संस्था आणि बँका आधार पडताळणी करू शकतात. वापरकर्ते त्यांचा बायोमेट्रिक डेटा देखील लॉक करू शकतात, ज्यामुळे फक्त OTP वापरता येतो. जर कोणी आधार क्रमांकाचा गैरवापर केला तर त्याला मोठा दंड देखील होऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आधार कार्डचे नवीन स्वरूप का आणले जात आहे?

    Ans: आधार कार्ड वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणी अधिक गोपनीय करण्यासाठी आणले जात आहे.

  • Que: नवीन आधार कार्डमध्ये कोणते बदल केले जातील?

    Ans: नवीन कार्डवर नाव, पत्ता किंवा क्रमांक नसेल; फक्त फोटो आणि गोपनीय माहितीचा सुरक्षित QR कोड दिला जाईल.

  • Que: संमतीशिवाय आधार पडताळणी केल्यास किती दंड होऊ शकतो?

    Ans: जर कोणी संमतीशिवाय आधार पडताळणी केल्यास संबंधित संस्थेला UIDAI नियमांनुसार एक कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

Web Title: Aadhaar card update news the new aadhaar card is coming to you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • aadhar card
  • Aadhar Link
  • Central Governement
  • otp

संबंधित बातम्या

NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे
1

NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर
2

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.