Abbott कडून FreeStyle Libre 2 Plus लाँच, आता प्रत्येक मिनिटाला मोजता येणार शरीरातील ग्लुकोज
जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲबॉटने आज भारतात फ्रीस्टाइल लिब्र® टू प्लस हे नवे सेन्सर उपकरण लाँच केल्याची घोषणा केली. ॲबॉटच्या जागतिक स्तरावरील लोकप्रिय सतत ग्लुकोज मोजणाऱ्या प्रणालीमध्ये (Continuous Glucose Monitoring – CGM) ही नवी भर घालण्यात आली आहे. या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक मिनिटाला रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजते आणि ही आकडेवारी थेट युझर्सच्या स्मार्टफोनवर पाठवते.
यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना स्कॅनिंगची गरज न पडता त्यांच्या ग्लुकोजची पातळी सतत पाहता येते. शिवाय, रक्तातील साखरेची पातळी जास्त किंवा कमी झाली तर हे सेन्सर तात्काळ स्वयंचलित इशारे (Alerts) देतात. अशा वेळी रुग्ण योग्य निर्णय घेऊन आपले आरोग्य अधिक सुरक्षितपणे व्यवस्थापित करू शकतात.
Mahindra XUV 3XO RevX A ला मिळाला ‘हा’ नवीन फिचर, आता प्रवास होणार अधिकच मजेदार
ॲबॉटचे ‘फ्रीस्टाइल लिब्र® टू प्लस’ हे उपकरण ग्लुकोजचे रिअल-टाइम रीडिंग्स देत असल्याने मधुमेहींना आत्मविश्वास, अचूकता आणि सुलभता मिळते. सातत्याने ग्लुकोज मॉनिटरिंग, कस्टमाइज करण्याजोगे इशारे आणि नेहमीच्या फिंगरस्टिक्सशिवाय रक्तातील साखरेची माहिती मिळण्याची सुविधा – या सर्व गोष्टी मधुमेहाचे व्यवस्थापन अधिक आधुनिक पद्धतीने करण्यास मदत करतात.
भारतामध्ये सध्या १०१ दशलक्ष लोक मधुमेहासह जगत आहेत, ज्यामुळे देशाचा क्रमांक जगात दुसरा आहे. एवढ्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे CGM सारखी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. अशा उपकरणांमुळे रुग्णांना त्यांच्या प्रकृतीचे व्यवस्थापन सक्रिय पद्धतीने करण्याची संधी मिळते आणि गुंतागुंती टाळण्यास मदत होते.
नवीन Renault Kiger चा टिझर रिलीज, ‘हे’ नवीन फीचर्स मिळू शकतात पाहायला?
ॲबॉटच्या मधुमेह विभागाचे आशिया पॅसिफिक प्रदेशातील रिजनल मेडिकल अफेअर्स डायरेक्टर डॉ. केनेथ ली यांनी सांगितले, “ॲबॉटचे फ्रीस्टाइल लिब्र तंत्रज्ञान जगभरातील सात दशलक्षांहून अधिक लोकांचे जीवन बदलत आहे. फ्रीस्टाइल लिब्र® टू प्लस सर्व लोकसंख्यागटांमध्ये आणि विविध ग्लायसेमिक स्तरांमध्ये खात्रीशीर अचूकतेने काम करते. यामुळे लोकांना त्यांच्या अवस्थेचे व्यवस्थापन अधिक चांगल्या रीतीने करता येते.”
अभ्यासांनुसार, फ्रीस्टाइल लिब्र® टेक्नॉलॉजीमुळे रक्तातील साखर अचानक कमी होण्याच्या घटना ४३ टक्क्यांपर्यंत कमी होतात, तसेच HbA1c पातळीमध्ये ०.९ ते १.५ टक्क्यांची घट दिसून आली आहे. एवढेच नव्हे तर, रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरजही सुमारे ६६ टक्क्यांनी कमी झाली आहे.
ॲबॉटचा हा पुढाकार भारतातील मधुमेहींना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देऊन त्यांचे जीवन अधिक सुरक्षित, संतुलित व आत्मविश्वासपूर्ण बनवणार आहे.