
अदानी एअरपोर्टसने एजेंटिक एआय सोल्यूशन्ससाठी एआयओएनओएससोबत धोरणात्मक करार
आता जयपूर, मुंबई, अहमदाबाद आणि लखनऊसह देशभरातील आठ विमानतळांवरील प्रवाशांना त्यांच्या मातृभाषेत मदत मिळणार आहे. मदत केंद्रे तुम्हाला आवडणाऱ्या भाषेत मार्गदर्शन करणं आता शक्य होणार आहे. कारण अदानी विमानतळ आणि आयओएनओएस यांच्यातील भागीदारीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. एआय प्रवाशांना अधिक स्मार्ट आणि अधिक अंतर्ज्ञानी अनुभव प्रदान करेल.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) या भारतातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप एअरपोर्टसची सर्वात मोठी ऑपरेटर अदानी एंटरप्राइझेस लिमिटेडच्या उपकंपनीने आज इंटरग्लोब एंटरप्राइझेस कंपनी व एंटरप्राइज एआयमधील जागतिक अग्रणी एआयओएनओएससोबत धोरणात्मक कराराची घोषणा केली. या करारांतर्गत बहुभाषिक ओम्नी-चॅनेल एजेंटिंग एआय सोल्यूशनची अंमलबजावणी करण्यात येईल, जे प्रवाशांसाठी समकालीन पॅसेंजर हेल्प डेस्क अनुभव अधिक उत्साहित करेल,अशी माहिती मिळत आहे.
नवीन सोल्यूशन सर्व अदानी एअरपोर्टसवर सर्व चॅनेल्समध्ये सातत्यपूर्ण सहभाग अनुभव देईल, तसेच प्रवाशांशी कनेक्ट होऊन वैयक्तिकृत, बहुभाषिक पाठिंबा देईल. या सहयोगाच्या माध्यमातून एआयओएनओएस आपला मालकीहक्काचे एजेंटिग एआय प्लॅटफॉर्म इंटेलीमेट सादर करेल, जो क्षेत्र-केंद्रित संवादात्मक एआय व ऑटोमेशन वितरित करेल, अदानी एअरपोर्टसला विविध टचपॉइण्ट्सवर ग्राहक व कर्मचाऱ्यांशी त्यांच्या पसंतीच्या भाषांमधून वॉईस, चॅट, वेब व मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होण्यास सक्षम करेल.
एएएचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण बन्सल यांनी सांगितले की, ”एएएचएलमध्ये आमचा आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रवाशांना प्रथम प्राधान्य देणाऱ्या सर्वोत्तम, डिजिटल-केंद्रित नाविन्यतांच्या माध्यमातून विमानतळावरील अनुभव नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा दृष्टिकोन आहे, ज्यामुळे त्यांची प्रवासाबाबत चिंता उत्साहामध्ये बदलते. एआयओएनओएससोबत आमचा सहयोग आमच्या विमानतळावर प्रवाशांना विनासायास व वैयक्तिकृत प्रवासाचा अनुभव देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अव्हिओ, वनअॅप व एअरपोर्ट-इन-ए-बॉक्स अशा इन-हाऊस ऑफरिंग्जसोबत सहयोगाने आम्ही कनेक्टेड परिसंस्था निर्माण करत आहोत, जी कार्यक्षमता वाढवते, सर्वसमावेशकतेला चालना देते आणि भारतात स्मार्ट, शाश्वत व भविष्याकरिता सुसज्ज विमानतळांसाठी नवीन मापदंड स्थापित करते.”, अशी माहिती यावेळी देण्यात आली.