फोटो सौजन्य - Social Media
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या तंत्रज्ञान विभाग अदानी डिजिटल लॅब्स (एडीएल) ने भारतातील अदानीद्वारे व्यवस्थापित विमानतळांवरील प्रवाशांचा अनुभव अधिक खास करण्यासाठी महत्त्वाचे नवे उपक्रम जाहीर केले आहेत. या उपक्रमांत अदानी रिवॉर्डस्, ‘वनअॅप’मधील सुधारणा आणि डिजिटल लाउंज सेवा यांचा समावेश असून, विमानतळ आदरातिथ्य क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित झाले आहेत.
एडीएलच्या संचालिका सृष्टी अदानी यांनी सांगितले, ”नवीन एडीएल आपल्या कामकाजात उत्साह, विविध संकल्पना आणि उत्तम कौशल्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांना विशेष डिजिटल-प्रथम अनुभव देण्यासाठीच्या व्यापक धोरणामधील हा पहिला टप्पा आहे. आम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक प्रकल्पात प्रवाशांच्या प्रवासाशी संबंधित समस्या कमी करण्यासह त्यांचे निराकरण करतो. आमच्या सेवांमध्ये अद्ययावत माहिती, खास रिवॉर्डस् आणि विशेष स्तरीय लाउंज यांचा समावेश असेल, जे मानक अॅग्रीगेटर ऑफरिंगच्या पलीकडे जाऊन वैयक्तिकृत डिजिटल अनुभव देतील, ज्यामुळे प्रवाशांना आमच्या विमानतळांवरून अधिक उत्तम प्रवासाचा आनंद मिळेल.”
वाढ आणि नाविन्यतेचा भाग म्हणून एडीएलने अहमदाबादमध्ये १५० आसनी नवीन कार्यालय सुरू केले असून, येथून प्रवाशांच्या सोयीसाठी उपाययोजना विकसित केल्या जातील. या उपायांत वेळेचे बंधन, लांब रांगा, आणि सुविधांबद्दल जागरूकतेचा अभाव यांसारख्या अडचणींचा निपटारा केला जाईल.
अदानी वनअॅप सर्व विमानतळ सेवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणते. यामध्ये
या सर्व सुविधांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, अनुभव अधिक सुलभ होईल आणि विमानतळावरचा प्रत्येक क्षण अधिक आरामदायी बनेल. एडीएलच्या या पुढाकारामुळे अदानी विमानतळे केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता, वैयक्तिकृत डिजिटल आदरातिथ्याचा नवा अनुभव देणारी ठिकाणे बनतील.