Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani Airports आणि IHG हॉटेल्सचा ऐतिहासिक करार; देशातील 5 प्रमुख विमानतळांवर उभारणार 1500 हून अधिक रूम्स

भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानतळ ऑपरेटर अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, जगातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांनी वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांत हॉटेल विकसित करण्यावर स्वाक्षरी केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 06:24 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Adani Airports ties up with IHG : भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानतळ ऑपरेटर अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि जगातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांनी भारतातील प्रमुख विमानतळ-संलग्न आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांत पाच हॉटेल्स विकसित करण्यासाठी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे विविध ब्रँड्स आणि ठिकाणांवर जवळपास १,५०० पेक्षा जास्त रूम्‍सची भर पडणार आहे. हा पोर्टफोलिओ करार आयएचजीच्‍या भारतासाठी विकास योजनांशी संलग्न आहे. भारतातील वाढती प्रवासाची मागणी आणि विमान वाहतूक, पर्यटन व विमानतळ-केंद्रित शहरी पायाभूत सुविधांच्या जलद विस्ताराशी हा विकास सुसंगत आहे.

डिजिटल सोने-चांदी खरेदी आता अधिक सुरक्षित! ‘DPMACI’ संस्थेची स्थापना; ग्राहकांच्या संरक्षणासाठी कडक नियमावली

जयपूरमधील किम्पटन हॉटेलसह अदानी एअरपोर्ट सिटीजचा भाग

या पोर्टफोलिओमध्ये जयपूरमधील किम्पटन हॉटेलसह अदानी एअरपोर्ट सिटीजचा भाग असलेल्या आगामी हॉस्पिटॅलिटी-आधारित मिक्स्ड-युज प्रकल्पांतर्गत हॉलिडे इन आणि हॉलिडे इन एक्सप्रेस हॉटेल्सचा समावेश आहे. ही हॉटेल्स नवी मुंबई, मंगळुरू आणि तिरुवनंतपुरममध्ये नियोजित आहेत. ही भागीदारी अधिक सखोल आणि विस्तारित करण्यासाठी एएएचएल सध्या आयएचजीसोबत प्रगत स्तरावरील चर्चेत आहे.

किम्पटन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स ब्रँडचे भारतात पदार्पण

या भागीदारीमुळे किम्पटन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स ब्रँडचे भारतात पदार्पण होत आहे. जगभरात आपल्या नाविन्यपूर्ण डिझाइन, उत्कृष्ट खानपान अनुभव आणि लक्झरी बुटीक स्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या किम्पटनच्‍या आगमनामधून भारतातील प्रीमियम लाइफस्टाइल आदरातिथ्य अनुभवांची वाढती मागणी दिसून येते. भारतातील विमान वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रातील व्‍यापक वाढीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. वाढती प्रवासी संख्या, देशांतर्गत पर्यटन आणि व्यावसायिक प्रवासाची मागणी यामुळे विमानतळ-केंद्रित होणारा विकास आता महत्त्वाचे हॉस्पिटॅलिटी आणि व्यावसायिक केंद्र उदयास आणत आहे.

जागतिक दर्जाची ठिकाणे निर्माण करणे हा दृष्टिकोन – प्रणव अदाणी

अदाणी एंटरप्रायजेस लिमिटेडचे (एईएल) डायरेक्‍टर श्री. प्रणव अदाणी म्हणाले, “अदाणी ग्रुप हॉस्पिटॅलिटी आणि विमानतळ-केंद्रित शहरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आपला विस्तार करत असताना भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक परिसंस्थेभोवती प्रवास, मुक्‍काम आणि शहरी अनुभवांचा संयोजन असलेली जागतिक दर्जाची ठिकाणे निर्माण करणे हा आमचा दृष्टिकोन आहे. आम्ही हे व्यासपीठ जागतिक दर्जाची मानके, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची क्षमता असलेल्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय हॉटेल ब्रँड्सच्या भागीदारीतून उभारत आहोत. आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबत आमचा सहयोग आणि प्रमुख ठिकाणी पाच हॉटेल्सचा विकास हे भारताच्या दीर्घकालीन प्रवास आणि आर्थिक वाढीशी सुसंगत अशा उच्‍च दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी पायाभूत सुविधा दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

विमानतळ नेटवर्कद्वारे दरवर्षी लाखो प्रवाशांना सेवा

भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानतळ ऑपरेटर एएएचएल आपल्या विस्तारत असलेल्या विमानतळ नेटवर्कद्वारे दरवर्षी लाखो प्रवाशांना सेवा देते. कंपनी विमानतळांकडे फक्त प्रवासाचे साधन म्हणून न पाहता आदरातिथ्य, रिटेल, व्यावसायिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांचे संयोजन असलेली एकात्मिक शहरी परिसंस्था म्हणून विकसित करत आहे. प्रमुख शहरांमध्ये सुमारे ६६३ एकरवर पसरलेल्या आपल्या एअरपोर्ट सिटी विकासाच्या माध्यमातून एएएचएल प्रवासाचा अनुभव समृद्ध करण्यासोबत दीर्घकालीन आर्थिक आणि शहरी विकासाला चालना देणारी मिक्स्ड-युज ठिकाणे निर्माण करत आहे.

भारतामधील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधींचा विस्‍तार -सुदीप जैन

आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे साऊथ वेस्ट आशियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुदीप जैन म्हणाले, “अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जसोबत या सहयोगामधून भारतामधील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधींचा विस्‍तार दिसून येतो. विशेषतः मुख्य प्रवेशद्वारे असलेली शहरे आणि विमानतळ-आधारित प्रकल्पांमध्ये व्यवसाय, पर्यटन आणि ट्रान्झिट प्रवाशांकडून मोठी मागणी दिसून येत आहे. लक्झरी, प्रीमियम आणि आवश्‍यक ब्रँड्सच्या मिश्रणासह हा पोर्टफोलिओ आम्हाला देशभरातील वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती अर्थपूर्णरीत्या दृढ करण्यास मदत करेल. हा करार आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याद्वारे आम्ही भारतात किम्पटन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स सादर करत आहोत.” आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स सध्या भारतात सहा ब्रँड्सच्या अंतर्गत ५२ हॉटेल्स चालवत आहे, तसेच पुढील तीन ते पाच वर्षांत आणखी ९८ हॉटेल्स सुरू करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

Inflation Data : 42 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला, महागाईचा महा-विस्फोट; एप्रिलमध्ये तब्बल ‘इतक्या’वर पोहोचला आकडा

Web Title: Adani airports ties up with ihg to have five hotels with 1500 keys in mmr jaipur south india see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Adani
  • Adani Group
  • Adani News
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
1

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ
2

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय
3

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…
4

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.