
फोटो सौजन्य सोशल मीडिया
आतापर्यंत संपूर्ण प्रकल्पातील ७८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.तीन स्थानकांमुळे प्रवास होणार सुलभ या मार्गावर पारडी, कापसी खुर्द आणि ट्रान्सपोर्टनगर अशी तीन स्थानके विकसित केली जात आहेत. सेंट्रल एव्हेन्यू आणि भंडारा रोडला जोडणारा हा उन्नत मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व नागपुरातील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः पारडी, कळमना बाजारपेठ, लगतच्या औद्योगिक वसाहती आणि सिम्बायोसिस विद्यापीठात दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल.
व्हायाडक्ट साठी आवश्यक असलेल्या सर्व ५९६ पाइल्स आणि १२७ पाइल कॅप्सची उभारणी पूर्ण झाली आहे. एकूण १९९ खांबापैकी १९० खांब तयार झाले असून, १९७ पिलर कॅप्सपैकी १६७ बसविण्यात आले आहेत. याशिवाय, मार्गासाठी नियोजित १,८४४ सेगमेंट्सपैकी १,५३५ सेगमेंट्सचे कास्टिंग पूर्ण झाले आहे. एकूण १८१ व्हायाडक्ट स्पॅनपैकी १३६ स्पैन प्रत्यक्ष जागेवर बसविण्यात आले आहेत.
या मार्गावरील बॉक्स गर्डर्स बसविण्याची जबाबदारी ‘शिवालिक’ ‘शिखर’ आणि ‘गिरी’ या तीन लॉचिंग गर्डसँवर सोपविण्यात आली आहे. त्यापैकी ‘गिरी’ने ऑक्टोबर महिन्यातच आपले काम पूर्ण केले आहे. उर्वरित कामांमध्ये ‘शिवालिक’ जानेवारी २०२७ पर्यंत, तर ‘शिखर’ जुलै २०२७ पर्यंत निर्धारित उद्दिष्ट गाठण्याची अपेक्षा आहे.
Nagpur News : सीबीआयची धाड; महादेव रॅकेटचे नागपूर कनेक्शन; पॅनल ऑपरेटरच्या घरावर छापा
या संपूर्ण प्रकल्पातील अभियांत्रिकीचे खास आकर्षण म्हणजे विद्यमान पारडी उड्डाणपुलाच्या वरून आकाराला येणारा दोन किलोमीटरचा डबल डेकर व्हायाडक्ट. या भागात ‘शिखर’ लॉचिंग गर्डरने निर्धारित १.९५ किलोमीटरपैकी आतापर्यंत १.२५ किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे, नोव्हेंबर २०२४ मध्ये या मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडला देण्यात आले होते.
त्यानंतर महामेट्रो आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील सामंजस्य करारानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आता एक किलोमीटरचा भाग रुळ टाकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. उर्वरित कामही याच वेगाने पूर्ण झाल्यास पूर्व नागपुरातील मेट्रोसेवा लवकर सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.