Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : सीबीआयची धाड; महादेव रॅकेटचे नागपूर कनेक्शन; पॅनल ऑपरेटरच्या घरावर छापा

Nagpur News : महादेव ऑनलाइन बेटिंग रॅकेटचे नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. सीबीआयने नागपुरातील रवीनगर परिसरात पॅनेल ऑपरेटरशी संबंधित घरावर छापा टाकला. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 15, 2026 | 03:59 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ऑपरेटरला २०% नफा
  • इतरांच्या बँक खात्यांतून पैशांची उलाढाल
  • फ्रँचायझी पद्धतीने पॅनलचे जाळे
Nagpur News : सुमारे सहा हजार कोटींच्या महादेव ऑनलाईन सट्टा रॅकेटचे धागेदोरे आता नागपूरपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविनगर परिसरातील घरावर छापा टाकून झडती घेतली. हे घर महादेव सट्टा व्यासपीठासाठी पॅनल ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित असल्याचे समजते. देशातील सहा राज्यांमधील ३३ ठिकाणी केलेल्या व्यापक कारवाईचा हा एक भाग होता.

छाप्यात सीबीआयने महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. जप्त कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील सट्टा व्यवसायात गुंतवणूक करणारे तसेच या व्यवहारांना आर्थिक मदत पुरविणाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. संबंधित पॅनलम ऑपरेटरची बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीचीही चौकशी होणार आहे. प्राथमिक तपासानुसार, हा ऑपरेटर ग्राहकांकडून सट्टयाची रक्कम स्वीकारण आणि त्यांच्या खात्यांमध्ये सट्टयाचे पॉइंट जमा करण्याचे काम करीत होता.

प्रवर्तकाच्या चौकशीनंतर कारवाईला वेगः सहा हजार कोटींच्या कथित सट्टा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, या सट्टा व्यासपीठाचे संचालन परदेशातून केले जात होते. या प्रकरणातील प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला ओमानमधून भारतात आणल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने अलीकडेच देशभरात छापेमारी केली.

या कारवाईदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष सुरू असलेले सट्टा पॅनलही आढळले असून ते बंद केले. रविनगरातील छाप्यानंतर आता तपासाची व्याप्ती नागपुरातील या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Nagpur News : १०० नगरसेवकांनी केली आयुक्तांची कोंडी; सत्तापक्षनेते बाल्या बोरकर संतापले

ऑपरेटरला २०% नफा

ईडीच्या ऑगस्ट २०२३ मधील तपासात पॅनल ऑपरेटरला नफ्यातील २० टक्के हिस्सा दिला जात असल्याचे समोर आले होते. उर्वरित ईडीच्या एका तपासात मुख्यालय आणि फ्रँचायझी पॅनल यांच्यात ७० ३० प्रमाणात नफ्याची विभागणी होत असल्याचा उल्लेख केला होता.

इतरांच्या बँक खात्यांतून पैशांची उलाढाल

ग्राहकांना स्वतःच्या खात्यात पैसे जमा करण्याऐवजी इतर व्यक्तीच्या बैंक खात्यांत रक्कम पाठवण्यास सांगितले जात होते. यातील काही खाती कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडली होती. या खात्यामधून सट्ट‌चाची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यांत फिरवली जात असे.

त्यामुळे पैशाचा मूळ स्रोत आणि व्यवहारांमागील व्यक्ती शोधणे कठीण होत होते. त्यानंतर हवाला माध्यमातूनही पैशांची देवाणघेवाण केली जात असल्याचा संशय आहे. सट्टयातून मिळालेल्या रकमेचा काही भाग परदेशात पाठवण्यासाठीही या यंत्रणेचा वापर झाल्याचा संशय सीबीआयला आहे.

Nagpur News : स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

फ्रँचायझी पद्धतीने पॅनलचे जाळे

महादेव सट्टा रॅकेटचे काम एखाद्या संघटित फ्रँचायझी व्यवस्थेप्रमाणे चालत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पूर्वीच्या तपासात समोर आले होते. या व्यासपीठाचे प्रवर्तक त्यांच्या सहकाऱ्यांना छोट्या फ्रँचायझीप्रमाणे सट्टयाचे पॅनल विकत होते.

प्रत्येक पॅनलचा स्वतंत्र मालक असे आणि त्याच्या हाताखाली साधारणतः चार कर्मचारी काम करीत होते. मुख्यालयाकडून पॅनल चालकांना ग्राहकांची माहिती तयार करणे आणि सट्टा खाती हाताळण्याचे अधिकार दिले जात होते. हे ऑपरेटर ग्राहकांकडून पैसे जमा करून घेत त्यांचे वापरकर्ता खाते तयार करीत आणि त्यात सट्ट्याचे पॉइंट जमा करीत. ग्राहक जिंकल्यानंतर त्यांना रक्कम देण्याची जबाबदारीही स्थानिक पॅनल चालकांवर होती.

Web Title: Nagpur news cbi raid mahadev betting racket panel operator house cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Mahadev betting app case
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक
1

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?
2

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?

Raigad News: सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला आहे? घरांची लॉटरी कधी निघणार? तारीख जाहीर; अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना
3

Raigad News: सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला आहे? घरांची लॉटरी कधी निघणार? तारीख जाहीर; अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना

Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर
4

Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.