Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशला अंधारात ठेवणार अदानी समुह; वीज बील न भरल्याने दिला इशारा!

बांगलादेशसमोर नवा धोका निर्माण झाला आहे. वीज पुरवठ्याचे बिल मिळावे, यासाठी अदानी समूहाने बांगलादेशवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाने अंदाजित 500 दशलक्ष डॉलर भरण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता वेळेत वीज बील न भरल्यास शेजारील देश अंधारात डुबणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 09, 2024 | 10:05 PM
बांगलादेशला अंधारात ठेवणार अदानी समुह; वीज बील न भरल्याने दिला इशारा!

बांगलादेशला अंधारात ठेवणार अदानी समुह; वीज बील न भरल्याने दिला इशारा!

Follow Us
Follow Us:

शेख हसीना सरकार जाऊन, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेशमध्ये आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच कर्ज मिळवण्यासाठी जागतिक बँक, आयएमएफ, आशियाई विकास बँकेसह अनेक ठिकाणचे दरवाजे ठोठावले आहेत. आता बांगलादेशसमोर नवा धोका निर्माण झाला आहे. वीज पुरवठ्याचे बिल मिळावे, यासाठी अदानी समूहाने बांगलादेशवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाने अंदाजित 500 दशलक्ष डॉलर भरण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा – अंबानी-अदानी-टाटा नाही… तर ‘या’ मुंबईकराने घेतला देशातील सर्वात महागडा फ्लॅट!

अदानी समूह त्याच्या 1600 मेगावॅटच्या गोड्डा प्लांटमधून बांगलादेशला वीज पुरवतो. शेख हसीना सरकारच्या काळात हा करार झाला होता. आता नवीन सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूसने यांनी यास खूप महागडी डील म्हणण्यास सुरुवात केली आहे. या व्यवहारात पारदर्शकता ठेवली गेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शेख हसीना सरकारच्या काळात झालेल्या सरकारच्या अनेक पायाभूत डीलकडे देखील त्यांनी बोट दाखवले आहे.

एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मोहम्मद युनूस सरकार अंदाजे 500 दशलक्षचे हे पेमेंट करण्यास नाखूष आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अदानी समूहाने अंतरिम सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. बांगलादेशमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारसमोरील सर्वात मोठे संकट बांगलादेशचे कर्ज आहे. अदानी समूहाच्या म्हणण्यानुसार ते सतत अंतरिम सरकारशी बोलत आहेत.

हे देखील वाचा – 20,000 कोटींचा मालक! कधीकाळी मुंबईतील झोपडपट्टीत राहिला; उदरनिर्वाहासाठी पुस्तके, राख्या विकल्या!

अदानी समुहाने बांग्लादेश सरकारला प्रत्येक परिस्थितीची माहिती दिली आहे. बांगलादेशला वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. परंतु, प्रलंबित बिले अर्थात देयके चिंता वाढवत आहेत. दोन्ही पक्षांची स्वतःची जबाबदारी आहे. त्यांची पूर्तता झाली नाही तर समस्या निर्माण होतील. अहवालात दावा करण्यात आला आहे की, एकट्या बांगलादेशचे वीज बिल 3.7 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. यापैकी, अंदाजे 492 दशलक्ष डॉलर फक्त अदानी समूहाचे आहेत. बांगलादेशला इतर गोष्टींसह अदानी समूहाला सुमारे 800 दशलक्ष डॉलर्स द्यावे लागणार आहेत.

Web Title: Adani group issues warning to bangladesh for overdue power debt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 10:05 PM

Topics:  

  • Adani Group
  • Bangladesh Crisis
  • Muhammad Yunus

संबंधित बातम्या

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
1

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.