अंबानी-अदानी-टाटा नाही... तर 'या' मुंबईकराने घेतला देशातील सर्वात महागडा फ्लॅट!
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आता देशातील सर्वात महागड्या फ्लॅटचा सौदा झाला आहे. 369 कोटी रुपयांचा हा फ्लॅट आहे. देशातील सर्वात महागड्या अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट विकला गेला आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल्सवरील एका शे-फेसिंग अपार्टमेंटमध्ये सर्वात महागडा सौदा करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लोढा ग्रुपची कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सने हा लक्झरी अपार्टमेंट तयार केला आहे.
देशातील सर्वात महागडा फ्लॅट
लोढा मलबार सुपर लक्झरी रेसिडेन्शिअलचा हा अपार्टमेंट देशातील सर्वात महागडा फ्लॅट मानला जातो. आता तुम्हाला वाटत असणार मुकेश अंबानी, गौतम अदानी किंवा रतन टाटा सारख्या मोठ्या उद्योगपतींनी हा सर्वात महागडा फ्लॅट घेतला असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहे. प्रसिद्ध उद्योगपती जे.पी. तापडिया यांनी देशातील सर्वात महागडा फ्लॅट घेतला आहे. तापडिया कुटुंबाने लोढा मलबार सुपर लक्झरी निवासी टॉवरमध्ये 26व्या, 27व्या आणि 28व्या मजल्यावर ट्रिपलेक्स फ्लॅट खरेदी केले आहेत.
हे देखील वाचा – ‘या’ शहरात उभारला जाणार भारतातील सर्वात मोठा मॉल; तब्बल 3000 जणांना मिळणार नोकरी!
1.08 एकरमध्ये पसरलेय हे अपार्टमेंट
1.08 एकरमध्ये हे अपार्टमेंट पसरले आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. फ्लॅटच्या ड्रॉईंग रूम आणि बेडरूममधून अरबी समुद्राच्या लाटांचे सुंदर दृश्य दिसते. आलिशान फ्लॅटचे आतील भाग पाहण्यासारखे आहेत. ट्रिपलेक्स अपार्टमेंटचे कार्पेट एरिया 27,160 स्क्वेअर फूट आहे. लोढा मलबार प्रकल्पाचे आर्किटेक्चर हाफिज कॉन्ट्रॅक्टर या जगातील अव्वल आर्किटेक्चर कंपनीने तयार केले आहे. इंटीरियरचे काम स्टुडिओ एचबीएने केले आहे. तापडिया कुटुंबियांनी या फ्लॅटसाठी 19.07 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते.
हे देखील वाचा – …आता कर्करोगावरील औषधांवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय!
1990 मध्ये फेमी केअरची स्थापना
जे.पी. तापडिया हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांनी 1990 मध्ये फेमी केअरची स्थापना केली. त्यांनी ही कंपनी इतकी मोठी केली की आज फेमी केअर ही जगातील सर्वात मोठी कॉपर-टी उत्पादन करणारी कंपनी आहे. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये 11,000 स्क्वेअर फुटांचे डुप्लेक्स अपार्टमेंट 60 कोटी रुपयांना खरेदी केले होते. बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनीही त्याच अपार्टमेंटमध्ये 29व्या, 30व्या आणि 31व्या मजल्यावर ट्रिपलेक्स खरेदी केले होते. ज्यासाठी त्यांनी 252.5 कोटी रुपये दिले होते.