Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन अग्रेसर ब्रँड, एक गोड मोहीम! ऍल्पेनलीबे आणि स्विगीने सुरू केले ‘स्वीटेस्ट सिटी चॅलेंज’

परफेटी वॅन मेल इंडियाचा लोकप्रिय ब्रँड ऍल्पेनलीबे आणि स्विगी यांनी संयुक्तपणे ‘स्वीटेस्ट सिटी चॅलेंज’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश डिलिव्हरी पार्टनर्सप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करणे हा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 23, 2026 | 07:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

परफेटी वॅन मेल इंडियाचा लोकप्रिय कन्फेक्शनरी ब्रँड ऍल्पेनलीबे आणि आघाडीचे ऑन-डिमांड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी यांनी एकत्र येत ‘स्वीटेस्ट सिटी चॅलेंज’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता यांसह देशातील २० हून अधिक शहरांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Jio ने बदलले नशीब! अवघ्या 10 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदाराला केलं अब्जाधीश, 48 कोटींचे थेट 5800 कोटी!

वेगवान शहरी जीवनशैलीत डिलिव्हरी पार्टनर्स हे लाखो ग्राहक आणि सेवांमधील महत्त्वाचा दुवा बनले आहेत. याच पार्श्वभूमीवर ऍल्पेनलीबे आणि स्विगी यांनी छोट्या-छोट्या कृतींमधून माणुसकीचा गोडवा जपण्याचा संदेश दिला आहे. ग्राहकांनी डिलिव्हरी स्वीकारताना एक स्मितहास्य, मनापासून व्यक्त केलेले आभार, पाण्याचा ग्लास किंवा कौतुकाचे काही शब्द दिले, तरी त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

ऍल्पेनलीबेने सुमारे २८ हजार डिलिव्हरी पार्टनर्सच्या सहभागातून तयार केलेल्या ‘इंडियाज स्वीटनेस रिपोर्ट’मध्ये काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली आहेत. या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक पाचपैकी जवळपास दोन वेळा डिलिव्हरी पार्टनर्सना अपेक्षेपेक्षा कमी सकारात्मक अनुभव मिळतो, तर चारपैकी एका डिलिव्हरीमध्ये ग्राहकांकडून साधे स्वागत किंवा आभाराचे शब्दही मिळत नाहीत. मात्र, बहुतांश ग्राहक आदराने वागतात आणि या नात्यात आणखी उबदारपणा आणण्याची संधी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परफेटी वॅन मेल इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर गुंजन खेतान यांनी सांगितले की, ब्रँड्सनी केवळ उत्पादने विकण्यापुरते मर्यादित न राहता समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘स्वीटेस्ट सिटी चॅलेंज’ ही त्याच विचारसरणीची पुढची पायरी असून, छोट्या संवादातूनही मोठा सामाजिक परिणाम घडू शकतो, असे त्यांनी म्हटले.

स्विगीच्या फूड मार्केटप्लेसमधील चालक आणि वितरण विभागाच्या कोमल अरोरा यांनीही या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, डिलिव्हरी पार्टनर्स हे कंपनीच्या कामकाजाचा कणा आहेत. ग्राहकांकडून मिळणारे एक साधे हसू, मनापासून व्यक्त केलेले आभार किंवा छोटासा संवाददेखील त्यांच्या दिवसाला सकारात्मक वळण देऊ शकतो. अशा छोट्या कृतींमुळे डिलिव्हरीचा अनुभव अधिक अर्थपूर्ण बनतो आणि त्यातून परस्पर सन्मानाची भावना वाढीस लागते.

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!

या मोहिमेद्वारे ऍल्पेनलीबे आणि स्विगी ग्राहकांना केवळ सेवा घेणारे म्हणून नव्हे, तर समाजात सकारात्मक बदल घडवणारे सहभागी बनण्याचे आवाहन करत आहेत. डिलिव्हरी पार्टनर्सच्या मेहनतीची दखल घेणे, त्यांच्याशी सन्मानाने वागणे आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये माणुसकी जपणे, हा ‘स्वीटेस्ट सिटी चॅलेंज’चा मुख्य संदेश आहे. छोट्या सद्भावनेतून मोठा बदल घडू शकतो, याच विश्वासावर आधारित ही मोहीम शहराशहरांत गोडवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Alpenliebe partnership with swiggy and new movement of them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Mhaswad
  • Swiggy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.