Amazon Air ची मोठी झेप
या सेवेमुळे सेव्हन सिस्टर्स राज्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांना एकात्मिक अशा हवाई आणि रस्ते वाहतूकीच्या नेटवर्कने जोडून या राज्यांतील डिलिव्हरीजना सहकार्य प्राप्त होईल. विशेष अशा हवाई क्षमतेला मल्टीमोडल वाहतूक सुविधांशी जोडल्यामुळे ॲमेझॉनला वाहतूकीचा वेळ कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे पाच पट पर्यंत डिलिव्हरीचा वेळ कमी होणार आहे, यामुळे वैविध्यपूर्ण उत्पादने अगदी रोजच्या गरजांपासून ते स्मार्टफोन पर्यंत, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्यूटी उत्पादनांसह अनेक उत्पादने ग्राहकांपर्यंत वेगाने उपलब्ध होऊ शकतील.
Amazon च्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025’ ची घोषणा; जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स!
एअर फ्लाईटला हिरवा झेंडा
गुवाहटी कडे जाणार्या पहिल्या ॲमेझॉन एअर फ्लाईटला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री श्राम मोहन नायडू किंजरप्पू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी त्यांच्या सह, ॲमेझॉन च्या इंडिया ॲन्ड ऑस्ट्रेलिया च्या ऑपरेशन्स चे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंग, ॲमेझॉन इंडिया च्या पब्लिक पॉलिसीचे व्हीपी चेतन कुमारस्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला प्राधान्य देण्यासाठी ‘ॲक्ट ईस्ट, ॲक्ट फास्ट, ॲक्ट फर्स्ट’ दृष्टिकोन आपल्याला दिला असून या अंतर्गत ईशान्य भारतात पायाभूत सुविधा आणि जोडणी दिल्याने हा भाग अतिशय वेगाने विकसित होत आहे. आज ईशान्येकडील प्रत्येक राज्यात विमानतळ आहे आणि काम सुरु असलेल्या विमानतळा मध्ये वाढ होऊन २०१४ मध्ये ४ विमानतळे होती ती वाढून १६ वर गेली आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरील हॉर्टिकल्चर आणि कार्गो निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. ॲमेझॉन एअरच्या दिल्ली आणि गुवाहटी दरम्यानच्या या सुरुवाती मुळे ईशान्य भारतातील शेतकर्यांना, कलाकारांना आणि व्यावसायिकांना मोठे सहकार्य मिळेल. सरकार कडूनही देशातील हवाई वाहतूकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या आहेत. २०२६ च्या अर्थसंकल्पामध्ये हवाई कार्गो सुविधा आणि वेअरहाऊस क्षमतांच्या विकासासाठी विशेष भर दिला आहे, जेणेकरुन नाशिवंत आणि उच्च मुल्याच्या मालाची वाहतूक वेगाने होऊ शकेल. त्याच बरोबर कुरियर ने निर्यात करण्यासाठीची असलेली मर्यादा काढून टाकल्याने आता परदेशातील ई कॉमर्स ला सुध्दा चालना मिळू शकेल. आणि मी ॲमेझॉनचे या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरुवात करुन देशातील नेटवर्क वाढवल्या बद्दल अभिनंदन करतो.” असे भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरप्पू यांनी सांगितले.
रोजगार निर्मिती
“ईशान्येकडील राज्यांमधील व्यवसायांना आणि रोजगार निर्मितीसाठी स्थानिक व्यावसायिकांसाठी सुधारीत वाहतूक जोडणीमुळे उत्तम भूमिका बजावली जाईल. या भागातील विक्रेत्यांसाठी ॲमेझॉन एअर सेवा गुवाहटी साठी सुरु झाल्यामुळे या व्यावसायिकांना ग्राहकांची संख्या वाढवण्यासाह भारतात वेगाने वाढणार्या डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान देण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच बरोबर ग्राहकांना वेगाने आणि अधिक विश्वसनीय अशा डिलिव्हरीज आसाम आणि आसपासच्या ईशान्य भागातील समाजाला याचा लाभ होईल. वाहतूकीतील या प्रगतीशील सुविधांमुळे स्थानीय तरुणांना सुध्दा रोजगार मिळू शकेल. अशी आशा आहे की ॲमेझॉन एअर च्या सेवा सुरु झाल्यामुळे ॲमेझॉन एअर सर्व्हिसेस कडून या भागातील एकूण आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.” असे डॉ. रवी कोटा, आयएएस, मुख्य सचिव, आसाम यांनी सांगितले.
ग्राहकांसाठी उत्तम
“ २०१३ मध्ये amazon.in सुरु केल्या पासून आम्ही सातत्याने भारतातील सर्वांत मोठ्या वाहतूक नेटवर्क्स पैकी एक नेटवर्क स्थापित करुन देशभरांतील कुठल्याही ग्राहकांना सेवा देत आहोत. ॲमेझॉन एअर च्या या ईशान्येकडील सेवांतील वाढ ही नैसर्गिक अशी गुंतवणूक असून यामुळे देशभरांतील जोडणी अधिक सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला आम्ही अधोरेखित करत आहोत. ही वाढ सरकारच्या सुधारीत वाहतूक सुविधांमधील सुधारणे नुसार असून यामुळे या भागातील आर्थिक संधी सुध्दा वाढण्यास मदत होईल. ग्राहकांसाठी सुद्धा ॲमेझॉनची वैविध्यपूर्णत: आता ५ पट अधिक गतीने होणार आहे, तर ईशान्य भागातील विक्रेत्यांसह व्यावसायिकांना आता संपूर्ण भारतातील ग्राहकांशी अधिक वेगाने आणि अधिक विश्वसनीयतेने जोडणे शक्य होणार आहे.” असे ॲमेझॉनच्या इंडिया ॲन्ड ऑस्ट्रेलिया ऑपरेशन्सचे VP अभिनव सिंग यांनी सांगितले






