Amazon-Flipkart Sale 2024: Flipkart-Amazon सेलमधून iPhone विकत घेतला! पण MFNP तपासले का?
Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days दोन्ही सेल अगदी जोरात सुरु आहेत. ग्राहक मोठ्या उत्साहात खरेदी करत आहेत. खास करून या सेलमध्ये सर्वात जास्त विक्री होत आहे iPhone ची. Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days मध्ये iPhone वर जबरदस्त डिस्काऊंट देण्यात आलं आहे. त्यामुळे iPhone च्या खरेदीसाठी ज्याप्रमाणे Apple स्टोअर्सवर गर्दी असते, त्याचप्रमाणे आता Amazon आणि Flipkart वर सुध्दा ट्रॅफीक पाहायला मिळत आहे. iPhone ऑर्डर केल्यानंतर 7 ते 8 दिवसांत तुम्हाला डिलीव्हरी मिळते.
हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत
iPhone ची खरेदी केल्यानंतर काही गोष्टी तपासणं गरजेचं असतं, अन्यथा आपल्याला मिळालेला आयफोन जुना असू शकतो किंवा तो दुरुस्त केलेला असण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर तो अशा देशातून आला असावा जिथे अनियमितता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे iPhone ची खरेदी केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते MFNP. Amazon किंवा Flipkart वरून iPhone खरेदी केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घेणं, गरजेचं आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
यापूर्वी फक्त फ्लिपकार्ट स्मार्टफोनवर ओपन बॉक्स डिलिव्हरी देत होता. परंतु आता ॲमेझॉन देखील ही सेवा प्रदान करते. पार्सल डिलिव्हरी करणारी व्यक्ती तुमच्या समोर बॉक्स उघडेल आणि नंतर फोन चालू करून दाखवेल. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे. जर ती व्यक्ती तुम्हाला व्हिडिओ बनवण्यापासून रोखत असेल तर ते पार्सल घेऊ नका. अशा पार्सलच्या माध्यमातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, फोन बॉक्सवर IMEI किंवा अनुक्रमांक आढळेल. Apple च्या वेबसाइटला भेट देऊन अनुक्रमांक तपासा. जर फोन नवीन असेल तर एक वर्षाची वॉरंटी तिथे दिसणार आहे. फोन जुना असेल तर तुम्हाला वेबसाईट वरून याची माहिती मिळले. लक्षात ठेवा की या प्रक्रियेत काही चूक आढळल्यास पार्सल घेऊ नका. आजकाल कोणतेही प्लॅटफॉर्म दोषपूर्ण किंवा तुटलेले उत्पादन वगळता बदलण्याची ऑफर देत नाही.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: बिग बिलियन डेजमध्ये आयफोन आणि POCO स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी!
आयफोन हातात आल्यावर आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे मॉडेल क्रमांक About मध्ये दिसेल. येथे MFNP पहिल्या अक्षरात लिहिले जाईल.
# M म्हणजे आनंदाची बातमी. याचा अर्थ तुम्हाला मिळालेला आयफोन एकदम नवीन आहे. त्यामुळे तुमच्या आयफोनमध्ये सिमकार्ड अॅड करा आणि आयफोन वापरण्यास सुरुवात करा.
# F म्हणजे तुम्हाला मिळालेला आयफोन Refurbished केलेला आहे. म्हणजे फोन नवीनसारखा आहे परंतु नवीन नाही. फोनचा पहिला मालक दुसरा कोणीतरी आहे. अशावेळी तुम्हाला जराही वेळ वाया न घालवता कस्टमर केअरला कॉल करावा लागेल आणि तुमचा आयफोन परत करावा लागेल.
# N म्हणजे, हे देखील नवीन नसून बदलण्याचे साधन आहे. समजा Apple च्या वॉरंटी किंवा पॉलिसी अंतर्गत आयफोन खराब झाला आणि नंतर कंपनीने हा फोन नवीन डिव्हाईससह बदलून दिला आहे. अशावेळी सुध्दा कस्टमर केयर झिंदाबाद.
# P म्हणजे वैयक्तिक पण तुमच्यासाठी नाही तर ज्याने ते विकत घेतले त्याच्यासाठी. जेव्हा तुम्ही Apple Store किंवा वेबसाइटवरून एखादे उपकरण खरेदी करता तेव्हा कंपनी त्यावर तुमचे नाव टॅटू करून घेण्याची सेवा देते. येथे तुम्हाला तुमचं नाव दिसतं नसेल तर फोनचा खरा मालक कोणी दुसरा आहे.