Photo Credit- X
अमेझॉनने (Amazon) आपल्या बहुप्रतिक्षित ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025’ ची घोषणा केली आहे. लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही सेल सुरू होणार आहे. फ्लिपकार्टनेही अलीकडेच आपल्या सेलची घोषणा केली असल्यामुळे, दोन्ही कंपन्यांमध्ये यंदा जोरदार स्पर्धा पाहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही ग्राहक मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही आणि घरगुती उपकरणे (Home Appliances) मोठ्या सवलतीत खरेदी करू शकतील. अमेझॉनने या सेलसाठी एक खास मायक्रो साईट देखील तयार केली आहे.
या फेस्टिव्हल सेलमध्ये Samsung, iQOO, Apple, OnePlus, HP, Boat, Sony सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स स्वस्त दरात मिळतील. कंपनीने घोषित केल्यानुसार, SBI च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर प्रत्येक खरेदीवर 10% त्वरित सूट (instant discount) दिली जाईल. याव्यतिरिक्त, ग्राहक नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकतील.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 40% पर्यंत सूट, तर HP, Samsung, Boat आणि Sony सारख्या ब्रँड्सच्या ॲक्सेसरीजवर तब्बल 80% पर्यंत सूट मिळू शकते. LG, Samsung, Haier, Godrej सारख्या कंपन्यांच्या होम अप्लायंसेसवर 65% पर्यंत सूट मिळेल. त्याचप्रमाणे, सोनी, सॅमसंग, एलजी, शाओमीच्या लेटेस्ट स्मार्ट टीव्हीवर देखील 65% पर्यंत सूट उपलब्ध असेल. ऑडिओ प्रॉडक्ट्सवर 50% पर्यंत बचत करता येईल.
अमेझॉनने अद्याप सेलची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही, परंतु ही सेल फ्लिपकार्टच्या सेलच्या आसपासच सुरू होण्याची शक्यता आहे. या फेस्टिव्हल सेलमध्ये अमेझॉन प्राइम (Amazon Prime) सदस्यांना २४ तास आधी ‘अर्ली ॲक्सेस’ मिळेल. ज्यांच्याकडे प्राइम सबस्क्रिप्शन आहे, त्यांना स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपवरील विशेष डील्स आधीच मिळवता येतील. या सेलमध्ये OnePlus 13R, Samsung Galaxy S24 Ultra, Galaxy Z Fold 6, iQOO 13 सारख्या प्रीमियम फोन्सच्या किमतींमध्ये मोठी कपात अपेक्षित आहे.