Fake Loan Fraud ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
दिवाळीच्या सणासुदीत ऑनलाईन ऑफर्सच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर करून ‘फेक लोन’ घेण्याचे नवे फंडे शोधले आहेत. तुमच्या नकळत कोणा दुसऱ्याने तुमच्या नावावर इन्स्टंट कर्ज तर उचललं नाही ना, हे फक्त दोन मिनिटांत ऑनलाईन सिबिल किंवा फिनटेक अॅप्सद्वारे कसं तपासायचं, याची ही माहिती आहे, चला तर मग जाणून घेऊया.Fake Loan Fraud:
आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर फक्त काही कागदपत्रांच्या आधारे झटपट कर्ज मंजूर केलं जातं, ज्याचा फायदा सायबर चोरटे घेतात. तुमच्या पॅन कार्डवर कोणतंही अनधिकृत कर्ज सुरू आहे की नाही, हे ऑनलाईन क्रेडिट रिपोर्टद्वारे तपासून फसवणूक झाली असल्यास तक्रार करणं खूप गरजेचं आहे.
अनेकदा लोकांना त्यांच्या नावावर कर्ज असल्याचं तोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत बँकांचे वसुली अधिकारी फोन करत नाहीत किंवा त्यांचा सिबिल स्कोअर अचानक घसरत नाही. या दिवाळीत तुमच्याही नकळत तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज लादलंय का, हे फक्त दोन मिनिटांत ऑनलाईन कसं तपासायचं आणि फसवणूक झाली तर कुठे तक्रार करायची, याची माहिती पुढे वाचा.
आजकाल अनेक फिनटेक कंपन्या आणि इन्स्टंट लोन अॅप्स फक्त पॅन आणि आधार नंबरच्या आधारे काही मिनिटांत कर्ज मंजूर करतात. सायबर चोरटे वेगवेगळ्या डेटा लीक किंवा बनावट फिशिंग लिंक्सच्या माध्यमातून तुमचा पॅन नंबर मिळवतात. त्यानंतर तुमच्या फोटोमध्ये फेरबदल करून किंवा बनावट मोबाईल नंबर लिंक करून कागदपत्रांचा गैरवापर करतात आणि कर्ज उचलतात.
याचा थेट फटका तुमच्या क्रेडिट प्रोफाईलला बसतो.म्हणजे तुम्ही कधी कर्ज घेतलंच नाही, पण तुमच्या नावावर कर्ज दिसतं. आणि त्याचे हप्ते न भरल्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. पुढे तुम्हाला खरंच कर्ज हवं असेल तेव्हा बँक तुम्हाला कर्ज देत नाही.
तुमच्या नावावर कोणतंही अनधिकृत कर्ज सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल किंवा क्रेडिट रिपोर्ट तपासावा लागेल. यासाठी खालील टेक प्लॅटफॉर्मचा वापर करा.
1. सिबिल वेबसाईट किंवा फिनटेक अॅप्सतुम्ही CIBIL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोफत वार्षिक क्रेडिट रिपोर्ट तपासू शकता.
याशिवाय OneScore, Paytm, Google Pay, किंवा Paisabazaar यांसारख्या नावाजलेल्या आणि सुरक्षित अॅप्सवर जाऊन ‘Check Credit Score’ वर क्लिक करा.
तिथे तुमचा पॅन नंबर, मोबाईल नंबर आणि नाव टाकून पडताळणी (OTP) पूर्ण करा.
2. क्रेडिट रिपोर्टचं विश्लेषण करातुमचा क्रेडिट रिपोर्ट डाऊनलोड केल्यानंतर ‘Accounts’ किंवा ‘Active Loans’ हा विभाग शोधा.
तिथे तुमच्या नावावर सध्या सुरू असलेल्या सगळ्या लहान-मोठ्या कर्जांची आणि क्रेडिट कार्ड्सची यादी दिसेल.
जर या यादीत तुम्ही न घेतलेलं एखादं कर्ज (उदा. 10,000 किंवा 20,000 रुपयांचं इन्स्टंट लोन) दिसत असेल, तर समजून जा की तुम्ही सायबर फ्रॉडचे शिकार झालात.
बँक किंवा लोन कंपनीशी संपर्क: क्रेडिट रिपोर्टमध्ये ज्या बँकेचं किंवा फायनान्स कंपनीचं नाव दिसतंय, त्यांच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि त्यांना या फ्रॉड लोनबद्दल ई-मेलद्वारे लेखी कळवा.
सिबिल डिस्प्युट रेझोल्युशन: सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन ‘Raise a Dispute’ या पर्यायावर क्लिक करा. तिथे संबंधित कर्ज तुमचं नसल्याचा दावा नोंदवा. सिबिल संबंधित बँकेकडून पडताळणी करून ते कर्ज तुमच्या रेकॉर्डमधून काढून टाकेल.
सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार: या फसवणुकीची अधिकृत तक्रार केंद्र सरकारच्या cybercrime.gov.in या सायबर पोर्टलवर नोंदवा किंवा 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करून लगेच गुन्हा नोंदवा.
तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पॅन कार्डच्या गैरवापराबाबत FIR दाखल करा.सणासुदीच्या काळात डिजिटल सुरक्षितता बाळगणं हाच यापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे. आजच तुमचा सिबिल रिपोर्ट तपासा आणि सुरक्षित राहा.
Ans: CIBIL किंवा इतर अधिकृत क्रेडिट रिपोर्ट प्लॅटफॉर्मवरून तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा.
Ans: 'Accounts' किंवा 'Active Loans' विभाग तपासावा. त्यात तुमच्या नावावरील कर्जांची माहिती दिसते.
Ans: डेटा लीक, फिशिंग लिंक किंवा बनावट मोबाईल नंबरच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून फसवणूक केली जाऊ शकते.






