Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा

Amazon News : अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ मध्ये दुचाकींच्या विक्रीत सहा पट वाढ झाली आहे. एकूण विक्रीत ६० टक्क्यांहून अधिक वाटा छोट्या आणि निमशहरी शहरांचा आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत आठ पट, तर दैनंदिन वापराच्या बाइकच्या विक्रीत १३.५ पट वाढ झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 02, 2026 | 05:51 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल
  • इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत आठ पट वाढ
  • २,३५० रुपयांच्या हप्त्यापासून दुचाकी खरेदीची संधी
Amazon News : सणासुदीच्या काळात खरेदीचा उत्साह वाढत असतानाच आता दुचाकी खरेदीसाठीही ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्मला पसंती देत आहेत. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये दुचाकींच्या विक्रीने मोठी झेप घेतली असून, अवघ्या काही दिवसांत विक्रीत सहा पट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या खरेदीत महानगरांपेक्षा छोट्या शहरांतील ग्राहक आघाडीवर आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर्सपासून प्रीमियम बाइक्सपर्यंत विविध वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ऑनलाइन दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल

सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीचा उत्साह वाढत असतानाच अमेझॉन इंडियावर दुचाकींच्या विक्रीने नवा विक्रम नोंदवला आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ दरम्यान दुचाकींच्या विक्रीत सरासरी दिवसाच्या तुलनेत तब्बल सहा पट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या विक्रीमध्ये महानगरांपेक्षा निमशहरी आणि छोट्या शहरांतील ग्राहकांचा मोठा सहभाग आहे. एकूण दुचाकी विक्रीत ६० टक्क्यांहून अधिक वाटा या शहरांमधील ग्राहकांचा असल्याचे अमेझॉनने जाहीर केले आहे.

हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, चेतक, अँपिअर, ट्रायम्फ आणि केटीएम यांसारख्या कंपन्यांच्या वाहनांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. सुरत, कोटा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, प्रयागराज, वारंगल, अमृतसर, लुधियाना, बेळगावी आणि कानपूर यांसारख्या शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher

इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत आठ पट वाढ

या खरेदी महोत्सवात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीनेही विशेष लक्ष वेधले आहे. चेतक आणि अँपिअर यांसारख्या ब्रँड्सच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत सरासरी दिवसाच्या तुलनेत आठ पट वाढ झाली आहे. दुसरीकडे, दैनंदिन वापरासाठीच्या दुचाकींच्या विक्रीचा वेग तब्बल १३.५ पट झाला आहे. प्रीमियम मोटारसायकलींच्या विक्रीतही अडीच पट वाढ नोंदवण्यात आली आहे.

ग्राहकांना घरबसल्या २०० हून अधिक मॉडेल्सची माहिती घेता येत असून, विविध वाहनांची तुलना करून खरेदीचा निर्णय घेता येत आहे. यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून दुचाकी खरेदी करण्याचा पर्याय अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे.

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

२,३५० रुपयांच्या हप्त्यापासून दुचाकी खरेदीची संधी

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमेझॉनकडून विविध आर्थिक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. अमेझॉन पे शॉपिंग लोनच्या माध्यमातून ग्राहकांना दरमहा २,३५० रुपयांपासून ईएमआयवर दुचाकी खरेदी करता येणार आहे. यासाठी २४ महिन्यांपर्यंतचा परतफेडीचा कालावधी उपलब्ध आहे. पात्र ग्राहकांना कर्ज सुविधेचाही लाभ घेता येणार आहे.

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईझीईएमआयवर १० टक्क्यांपर्यंत त्वरित सवलत मिळणार आहे. याशिवाय, इतर बँकांच्या कार्डवर ९ हजार रुपयांपर्यंत, कूपनद्वारे ३ हजार रुपयांपर्यंत आणि अमेझॉन पे यूपीआयद्वारे ७ हजार रुपयांपर्यंत बचतीची संधी आहे.

दरम्यान, वाहनांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या हेल्मेट, डॅशकॅम, जीपीएस ट्रॅकर आणि रायडिंग गिअर यांसारख्या वस्तूंच्या विक्रीतही वाढ झाली आहे. अमेझॉनच्या ऑटोमोटिव्ह स्टोअरची विक्री सरासरी दिवसाच्या तुलनेत २.२ पट झाली आहे.

Web Title: Amazon great indian festival 2026 two wheeler sales six times growthcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Amazon Great Indian Festival
  • Marathi News
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क
1

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड
2

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
3

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प
4

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.