Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प

Breaking News : बांगलादेशात वेतनवाढीच्या मागणीसाठी गारमेंट कामगारांचे आंदोलन हिंसक झाले आहे. १ नोव्हेंबर रोजी ५२९ कारखान्यांचे काम ठप्प झाले असून जवळपास ९.८७ लाख कामगार प्रभावित झाले. सरकारने वेतनवाढीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यीय मंडळ स्थापन केले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 02, 2026 | 04:28 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • वेतनवाढीची कामगारांचा आक्रमक पवित्रा
  • ५२९ कारखान्यांचे काम ठप्प
  • सरकार कडून वेतन मंडळाचीही स्थापना ; राजकीय पार्श्वभूमीही चर्चेत
Breaking News : बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली असून , जनतेमध्ये पुन्हा राग आणि असंतोष बघायला मिळत आहे . गेल्या काही महिन्यांपूर्वी बांगलादेशात देशव्यापी उठाव झाला .शेख हसीना यांना बांगलादेश सोडून भारतात यावे लागले . धर्मवादाचे राजकारण बांगलादेशात वाढले आहे . बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू तसेच इतर जातींना लक्ष केले जात आहे . शेख हसीना यांच्या काळातील जनतेमधील एकोपा , प्रेम नाहीसा झाला असून धार्मिक कट्टरपंथी राजकारण आणि समाजकारण वाढत चालले आहे .

जिथे जिथे धार्मिक कट्टरता वाढते कालांतराने त्या देशातील लोकांचे जीवन हे हळूहळू त्रासात जायला सुरु होते ,किंवा त्या देशाच्या आर्थिक , सामाजिक आणि राजकीय संस्कृतीवर दारिद्रय येते . वैज्ञानिक दृष्टिकोन मारला जातो , जनतेला त्याची किंमत राहत नाही . माणसे एकमेकांशी भेदभाव करू लागतात . याचेच प्रत्यक्ष रूप हे आपल्याला आज बांगलादेशमध्ये दिसून येत आहे .

वेतनवाढीची कामगारांचा आक्रमक पवित्रा

बांगलादेश हा त्याच्या बऱ्याच उद्योग धंद्यांसाठी प्रसिद्ध असताना या देशातील वस्त्रोउद्योग ही तेवढाच प्रसिद्ध आहे . पण गेल्या काही दिवसांत याच उद्योग क्षेत्राला उतरती कळा लागली असून या क्षेत्रातील कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे . तसेच याला गंभीर वळण सुद्धा लागले आहे . वाढती महागाई , अन्नधाने आणि रोजच्या वापरातील गरजांच्या खर्चात झालेली वाढ यामुळे गारमेंट कामगारांनी वेतनवाढीसाठी तीव्र आंदोलन केले आहे .

In Bangladesh, garment workers staged demonstrations and blocked roads in several industrial areas, demanding wage increase as cost of living rises. Follow: https://t.co/Ez42KDdHXv https://t.co/ynwoYI6hQl — PressTV Extra (@PresstvExtra) November 1, 2026

राजधानी ढाक्यासह गाझीपूर ,सावर आणि आशुलिया या औद्योगिक भागात हजारो कामगार रस्त्यावर उतरले आहेत . किमान मासिक वेतन सध्याच्या १२ हजार ५०० टका वरून ३० हजार टका करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे . या आंदोलनादरम्यान रस्ते अडवण्यात आले असून काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाला आहे .

Israel : 10 दिवसांच्या वेढ्यानंतर हेब्रॉनमधून इस्रायली सैन्य माघारी; कोट्यवधींचे नुकसान; पॅलेस्टिनी सुरक्षा दलाचे पूर्ण नियंत्रण

५२९ कारखान्यांचे काम ठप्प

बांगलादेश गारमेंट मनुफ्रॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स असोशिएशनच्या ( BGMEA ) माहितीनुसार १ नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलनामुळे देशातील ५२९ गारमेंट कारखान्यांचे कामकाज ठप्प झाले आहे . यामुळे जवळपास ९ लाख ८७ हजार कामगार प्रभावित झाले आहेत . मात्र हा आकडा बेरोजगार झालेल्या कामगारांचा नसून कारखाने बंद राहिल्यामुळे कामावर परिणाम झालेल्या कर्मचाऱ्यांचा आहे .

ढाका आणि गाझीपूरमध्ये आंदोलकांनी रस्ते रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली . काही ठिकाणी दगडफेक , वाहनांची जाळपोळ आणि पोलिसांसोबत मारामारी झाल्याच्या घटनाही घडल्या . परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला . या घडामोडींमुळे बांगलादेशच्या महत्वाच्या निर्यात क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे .

Moon Reactor : चंद्रावर महासत्तांची नवी लढाई; जाणून घ्या अणुभट्ट्या बसवण्यामागे काय आहे मोठे कारण?

सरकार कडून वेतन मंडळाचीही स्थापना ; राजकीय पार्श्वभूमीही चर्चेत

आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सहा सदस्यीय वेतन मंडळ स्थापन केले आहे . या मंडळामार्फत गारमेंट कामगारांच्या वेतनरचनेचा आढावा घेतला जाणार आहे . सरकारने कामगारांना कामावर परत जाण्याचे आवाहन केले आहे . दरम्यान शेख हसीना यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले . तारिक रहमान पंतप्रधान झाले असून जमात -ए-इस्लामी हा विरोधी पक्ष आहे .

Web Title: Bangladesh garment workers protest 529 factories shut down cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Bangladesh News
  • Breaking News
  • Marathi News

संबंधित बातम्या

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
1

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान
2

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
3

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher
4

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.