Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क

Kaun Banega Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर स्पर्धक ऋषिकेश मढवीने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवणारा विचार मांडला. कार्यक्रमात चांगली रक्कम जिंकता आली, तर त्यातील काही भाग खेळण्याची संधी न मिळालेल्या सहस्पर्धकांना देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 05:47 PM
Kaun Banega Crorepati: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kaun Banega Crorepati: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऋषिकेश मढवीचा सहस्पर्धकांसाठी खास निर्णय.
  • जिंकलेल्या रकमेतील काही भाग वाटण्याची इच्छा.
  • ऋषिकेशच्या विचाराने माधुरी दीक्षितही थक्क!

एखादा विजय खऱ्या अर्थाने खास कशामुळे ठरतो? ‘कोण होणार करोडपती’चा स्पर्धक ऋषिकेश मढवी याच्यासाठी विजयाचं महत्त्व केवळ स्वतः जिंकण्यात नसून, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यात आहे. कोण होणार करोडपातीच्या मंचावर माधुरी दीक्षित सोबत बोलताना ऋषिकेशनं सांगितलं की, या मंचावर त्याला चांगली रक्कम जिंकता आली, तर त्यातील काही भाग तो खेळण्याची संधी न मिळालेल्या आपल्या सहस्पर्धकांना देईल. त्याचा हा विचार ऐकून माधुरी देखील थक्क झाली. Kaun Banega Crorepati:

Shiv Thakare: यशाची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून काय करतो शिव ठाकरे? माधुरी दीक्षितसमोर दिलं उत्तर

या कार्यक्रमात सहभागी होणार

आपल्या या विचारामागचं कारण सांगताना ऋषिकेश म्हणाला की, कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आणि दोन भागांमध्ये तो स्वतःला खेळण्याची संधी कधी मिळणार, याची वाट पाहत होता. कार्यक्रमात येण्यापूर्वी त्याच्या गावात त्याच्याविषयी एक चित्रफीतही चित्रीत करण्यात आली होती. त्यामुळे गावातील सर्वांना तो या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती होती. अशा परिस्थितीत, खेळण्याची संधी न मिळताच घरी परतल्यावर गावकऱ्यांना काय सांगायचं, हा प्रश्न त्याला पडला होता.

इच्छा व्यक्त

स्वतःला आलेल्या या अनुभवातून ऋषिकेशला इतर स्पर्धकांची मनःस्थिती समजली. हॉट सीटवर बसण्याची संधी न मिळाल्यामुळे त्यांनाही निराश होऊन परतावं लागू शकतं, याची त्याला जाणीव आहे. आपल्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना सांगण्यासाठी त्यांच्याकडेही काहीतरी असावं, या भावनेतून त्यानं आपण जिंकलेल्या रकमेतील काही भाग त्यांच्यासोबत वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

Sharvari Wagh-Madhuri Dixit: माधुरी दीक्षितसोबत थिरकली शर्वरी वाघ; ‘ये प्रेम मोल लिया’च्या टायटल ट्रॅकवर रंगला खास क्षण

ऋषिकेश किती रक्कम जिंकणार

ऋषिकेशचा हा संवेदनशील आणि मनाचा मोठेपणा दाखवणारा विचार ऐकून माधुरीनं ऋषिकेशचं कौतुक करताना म्हटलं, “क्या बात है! या मंचावर पहिल्यांदाच हे घडतंय!” आता ऋषिकेश किती रक्कम जिंकणार आणि सहस्पर्धकांना किती रक्कम मिळणार, हे पहायला विसरू नका आज रात्री 9 वाजता कोण होणार करोडपतीच्या आजच्या भागात.

Web Title: Kaun banega crorepati hrishikesh madhavi prize money share co contestants rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा
1

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड
2

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
3

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प
4

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.