
Jalgaon SBI Robbery: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव तालुक्यातील भोकरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक रोकड लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले. या धाडसी कारवाईत लुटलेल्या मुद्देमालाच्या सर्व सहा बॅगा हस्तगत केल्या असून, दोन देशी कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. Jalgaon SBI Robbery:
विशेष म्हणजे, या टोळीतील एक आरोपी महाराष्ट्र पोलिस दलातील बडतर्फ उपनिरीक्षक असल्याची माहिती समोर आली असून, अन्य आरोपींचीही गंभीर गुन्ह्यांतील पाश्र्श्वभूमी उघड झाली आहे. रविवारी २.४५ वाजण्याच्या सुमारास भोकरी शाखेत सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश केला. जमिनीवर गोळी झाडत त्यांनी दहशत निर्माण केली, त्यानंतर कर्मचारी आणि व्यवस्थापकाला बांधून त्यांच्या तोंडावर पट्ट्या लावल्या. कर्मचाऱ्यांना धमकावत त्यांनी सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक रोकड सहा बॅगांमध्ये भरली. त्यानंतर दोन मोटारसायकलींवरून त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मदतीसाठी धावा केला.
दरोड्याची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संभाव्य पळवाटांवर सतर्कता वाढविण्यात आली. विविध पोलीस पथकांनी समन्वयाने शोधमोहीम सुरू केली. आरोपींचे वर्णन, त्यांचा पेहराव आणि त्यांनी वापरलेल्या दोन मोटारसायकलीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांनीही प्रसंगावधान राखत शोधमोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
प्राथमिक माहितीनुसार, या टोळीतील तीन आरोपींची काही वर्षापूर्वी जळगाव जिल्हा कारागृहात ओळख झाली होती. त्यानंतर चौथ्या आरोपीला सोबत घेत त्यांनी भोकरी येथील बँकेवर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कटाचे स्वरूप, आरोपींची भूमिका आणि गुन्ह्याशी संबंधित अन्य बाबीचा पोलीस तपास करीत आहेत.
दरोडा प्रकरणातील आरोपी शंकर जसक, अंकुश चव्हाण, गजानन पवार आणि अंकुश चव्हाण या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरोड्याचा कट, गुन्ह्यातील अन्य सहभाग आणि आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांना मदत करताना स्थानिक नागरिकांनी एका आरोपीला पकडण्यात यश मिळवले. त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी जवळच्या शेतात पळून गेला. मात्र, रस्त्यावर शोधमोहीम राबविणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने PSI वलटे यांच्या नेतृत्वाखाली त्याचा शोध सुरू ठेवला. सुमारे दीड तासाच्या शोधानंतर डीकसाई गाव परिसरात त्याला जेरबंद करण्यात आले.
त्याच्याकडील दोन बेंगा पोलिसांनी हस्तगत केल्या. दरम्यान, उर्वरित दोन आरोपी मोटारसायकलीवरून धरणगावच्या दिशेने पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, धरणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यानी पथकासह चावसखेडा बोगद्याजवळ नाकाबंदी केली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही अडवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील उर्वरित चार बेंगाही जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे काही तासातच चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. लुटलेल्या मुद्देमालाच्या सर्व सहा बेंगा हस्तगत झाल्याने पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले.
Jalgaon News: जळगावात बांभोरी पुलाजवळ कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही धक्कादायक आहे. आरोपी शंकर रमेश जसक हा महाराष्ट्र पोलीस दलातील २०१५ च्या ११३ व्या बॅचचा पोलीस उपनिरीक्षक होता, तो रायगड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल एसबीआय दरोडा प्रकरणात आरोपी झाल्याने २०२३ मध्ये त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. यापूर्वी २०१८ मध्ये महाड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईशी संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला निलंबितही करण्यात आले होते.
Ans: जळगाव तालुक्यातील भोकरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर सशस्त्र दरोडा पडला.
Ans: दरोडेखोरांनी सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक रोकड लुटली.
Ans: पोलिसांनी लुटलेल्या मुद्देमालाच्या सहा बॅगा, दोन देशी कट्टे आणि दोन दुचाकी जप्त केल्या.