Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतीतील कचऱ्यापासून आता बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’! अमेझॉन इंडिया आणि IIT रूरकी यांचा महत्त्वपूर्ण करार

अमेझॉन इंडियाने शेतीतील अपशिष्टापासून (Agri-waste) शाश्वत पॅकेजिंग साहित्य विकसित करण्यासाठी आयआयटी रूरकीशी (IIT Roorkee) करार केला आहे. या उपक्रमामुळे पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 07:50 PM
शेतीतील कचऱ्यापासून आता बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’! (photo Credit- X)

शेतीतील कचऱ्यापासून आता बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शेतीतील कचऱ्यापासून आता बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’!
  • अमेझॉन इंडिया आणि IIT रूरकी यांचा महत्त्वपूर्ण करार
मुंबई, फेब्रुवारी ४, २०२६: शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने अमेझॉन इंडियाने आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूरकीशी सहयोग कराराची घोषणा केली. लाकडाचा वापर न करता कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आणि त्यायोगे शेतीतील कचऱ्याचे ज्वलन टाळण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे, त्याचप्रमाणे ‘व्हर्जिन वूड पल्प’चा वापरही यामुळे कमी होऊ शकेल. हे कमी वजनाचे तरीही दणकट पॅकेजिंग साहित्य म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून तयार होणाऱ्या पारंपरिक साहित्यासाठी तसेच प्लास्टिक पिशव्यांसाठी रिसायकल करण्याजोगा आणि घरीच कॉम्पोस्टिंग करण्याजोगा पर्याय आहे.

गव्हाचा पेंढा आणि उसाची चिपाडे यांसारख्या शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर उच्च दर्जाच्या लगद्यामध्ये करून त्यापासून कागदी खोकी-पाकिटे तयार करण्यावर या संशोधनाचा भर असेल. या उत्पादनांची कामगिरी पारंपरिक कागदी पॅकेजिंग साहित्याच्या तोडीची असेल. त्यामुळे भारतातील पिकांचे खुंटे जाळण्याचे प्रमाण कमी करण्यातही मदत होणार आहे आणि एरवी जाळून टाकाव्या लागणाऱ्या कृषी कचऱ्याचे रूपांतर मौल्यवान पॅकेजिंग साहित्यात होणार आहे. आयात केल्या जाणाऱ्या ‘व्हर्जिन वूड पल्प’वरील अवलंबित्वही यामुळे कमी होईल आणि कृषी कचरा बाजारपेठेत विकून शेतकरीही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळवू शकतील.

आयआयटी रूरकीच्या पेपर अँड पॅकेजिंग टेक्नोलॉजी विभागासोबतचा हा सहयोग प्रकल्प प्रयोगशाळेतून सुरू होणार आहे, उत्पादनांचा विकास करून त्यांच्या चाचण्या घेण्याचे काम १५ महिन्यांहून अधिक काळापर्यंत चालणार आहे. उत्पादनांच्या दर्जाची चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरच्या टप्प्यात औद्योगिक चाचण्या, पडताळणी प्रक्रिया तसेच व्यावसायिक स्तरावर उत्पादन यांसाठी अमेझॉन सहाय्य करणार आहे.

‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

अमेझॉन इंडियातील ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले, “अमेझॉनमध्ये आम्ही भारतातील सर्वांत वेगवान, सुरक्षित व खात्रीशीर ऑपरेशन्स नेटवर्क उभे करत आहोत आणि हे नेटवर्क जास्तीत-जास्त शाश्वत करण्याप्रती आम्ही बांधील आहोत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, शेतीतील कचऱ्यापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने आम्ही आयआयटी रूरकीशी सहयोग करार करत आहोत. भारतात दरवर्षी सुमारे ५०० दशलक्ष टन कृषी कचरा निर्माण होतो, या कचऱ्याचा वापर पॅकेजिंगसाठी केल्यास आपण वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला सहाय्य करू शकू तसेच पारंपरिक पॅकेजिंग साहित्यावरील अवलंबित्वही कमी करू शकू.”

आयआयटी रूरकीचे संचालक प्राध्यापक कमल किशोर पंत म्हणाले, “शाश्वतता ही आता निवडीची बाब राहिलेली नाही, तो राष्ट्रीय स्तरावर तातडीने प्राधान्य देण्याचा विषय झाला आहे. आयआयटी रूरकी आणि अमेझॉन यांच्यातील हा सहयोग करार म्हणजे भारताचे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया तसेच राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण यांसारख्या सरकारी धोरणांशीही हा करार सुसंगत आहे. शेतीतील कचऱ्याचे रूपांतर विघटनशील पॅकेजिंग साहित्यात करून आपण पिकांचे खुंट जाळण्याच्या समस्येवरही उपाय देत आहेत आणि त्याच वेळी भारतातील ताज्या संसाधनांवरील ताणही कमी करत आहोत. उद्योजक, शेतकरी आणि एकंदर समाजाला लाभदायी ठरेल असा व्यापक उपाय आपण शोधत आहोत. शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक सहयोग यांच्या माध्यमातून अधिक शाश्वत व स्वयंपूर्ण भवितव्याच्या दिशेने चाललेल्या भारताच्या प्रवासाला अधिक वेग कसा देता येईल याचे प्रात्यक्षिक हा उपक्रम दाखवत आहे.”

आयआयटी रुरकी, सहारनपूर कॅम्पस येथील पेपर अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी विभागातील INNOPAP लॅब (पेपर अँड पॅकेजिंगमधील नवोन्मेष) मधील प्रो. विभोर कुमार रस्तोगी आणि डॉ. अनुराग कुलश्रेष्ठ हे या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करतील.

पॅकेजिंग कमी करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेझॉन भारतातील ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर्स त्यांच्या मूळ पॅकेजिंगमध्ये किंवा कमीत-कमी पॅकेजिंगमध्ये पाठवत आहे. कंपनी देशभरातील ३००हून अधिक शहरांमध्ये उत्पादनांच्या ऑर्डर्स पॅकेजिंग करून पाठवते. २०१९ सालापासून अमेझॉनने आपल्या सर्व फूलफिलमेंट केंद्रांतील पॅकेजिंगमधून एकदा वापरून टाकून देण्याचे प्लास्टिक पूर्णपणे बाद केले आहे.

आपली कामे अधिक शाश्वतरित्या करण्यासाठी अमेझॉन इंडिया बांधील आहे. आपल्या सर्व कामकाजांतून होणारे कार्बन उत्सर्जन २०४० सालापर्यंत शून्यावर आणण्याची ‘क्लायमेट प्लेज’ अमेझॉनने घेतली आहे. आम्ही थोड्याच काळात वेगाने व परिणामकारक प्रगती साध्य केली आहे, कार्बनमुक्त ऊर्जा, नवोन्मेष्कारी पॅकेजिंग, वाहतूक जाळ्याचे विद्युतीकरण, वर्तुळाकार सुधारणा आणि एआय यांच्यात गुंतवणूक करून कंपनी ही प्रगती साध्य करत आहे. अमेझॉनच्या थेट कामकाजात जेवढे पाणी वापरले जाते त्याहून जास्त पाणी २०२७ सालापर्यंत समुदायाला परत करण्याचे उद्दिष्ट अमेझॉनने ठेवले आहे.

Share Market Closed: बाजाराच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टीत वाढ; पण IT शेअर्समध्ये मोठी पडझड`

Web Title: Amazon india iit roorkee collaboration agri waste packaging products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची  वाढ
1

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट
4

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.