Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेझॉनचा मोठा धमाका! ‘Amazon Now’ सेवेचा 100 शहरांत विस्तार; काही मिनिटांत मिळणार घरपोच डिलिव्हरी

अमेझॉनने भारतात 'Amazon Now' सेवेचा 100 शहरांत विस्तार करण्याची घोषणा केली आहे. 1,000 मायक्रो सेंटर्सच्या मदतीने आता किराणा आणि इतर वस्तू काही मिनिटांत घरपोच मिळतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 03:17 PM
अमेझॉनचा मोठा धमाका! ‘Amazon Now’ सेवेचा 100 शहरांत विस्तार (Photo Credit- X)

अमेझॉनचा मोठा धमाका! ‘Amazon Now’ सेवेचा 100 शहरांत विस्तार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • अमेझॉनचा मोठा धमाका!
  • ‘Amazon Now’ सेवेचा 100 शहरांत विस्तार
  • काही मिनिटांत मिळणार घरपोच डिलिव्हरी
एप्रिल 2026 : अमेझॉन ने आज जाहीर केले की, “अमेझॉन नाऊ” ही मिनिटांत डिलिव्हरी देणारी सेवा भारतातील 100 शहरांपर्यंत विस्तारली जाणार आहे. या विस्तारासाठी कंपनी आपली विशेष फुलफिलमेंट व्यवस्था मजबूत करणार असून 1,000 पेक्षा अधिक मायक्रो-फुल फिलमेंट सेंटर्स (एमएफसी) उभारणार आहे. पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनौ, कानपूर, चंदीगड, अहमदाबाद, मेरठ, मैसूर, पानिपत, कोची, अमृतसर, मंगळुरू आणि विशाखापट्टणम (विझाग) यांसारख्या मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांतील ग्राहकांना या सेवेतून खरेदी करता येणार आहे. तसेच मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरू या विद्यमान शहरांमध्येही ही सेवा उपलब्ध राहणार आहे. या सेवेत ग्राहकांना रोजच्या गरजेच्या हजारो वस्तू, जसे की किराणा (फळे-भाज्या, गोठवलेले अन्न), वैयक्तिक देखभाल उत्पादने, फॅशन व ब्युटी वस्तू, लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बाळांसाठी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे साहित्य, आरोग्य पूरक आदी, अत्यंत कमी वेळेत, काही मिनिटांत मिळणार आहेत.

अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष- एव्हरीडे एसेन्शियल्स, हर्ष गोयल म्हणाले, “ग्राहकांकडून अमेझॉन नाऊ ला सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः जलद डिलिव्हरी, परवडणारी किंमत आणि विविध पर्याय, यासोबतच शेतकऱ्यांकडून थेट मिळणाऱ्या ताज्या उत्पादनांच्या गुणवत्तेचे ग्राहक कौतुक करत आहेत. या यशामुळे आम्ही आमच्या विस्तार योजनांना अधिक वेग दिला असून 1,000 पेक्षा जास्त मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्सच्या जाळ्याच्या मदतीने अमेझॉन नाऊ ही सेवा 100 शहरांपर्यंत वाढवणार आहोत.

Trade Deal: मोठी बातमी! India – New Zealand मैत्रीचा नवा टप्पा! 70% भारतीय मालावर आता Tax नाही, कोणाला होणार फायदा?

या विस्तारामुळे 16,000 हून अधिक शेतकऱ्यांना आमच्या तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीचा लाभ घेता येईल आणि ते अमेझॉन नाऊ वरील विक्रेत्यांद्वारे आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतील. ग्राहकांना आमच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या निवडीसह अतिजलद डिलिव्हरीचा लाभ मिळत राहील, हजारो दैनंदिन आवश्यक वस्तू, ज्यात नाशवंत वस्तूंचाही समावेश आहे, काही मिनिटांत, मिलियनपेक्षा अधिक वस्तू त्याच दिवशी आणि आणखी 4 मिलियन पुढील दिवशी Amazon.in वर उपलब्ध असतील.”

अमेझॉन नाऊ चा जलद विस्तार हा अमेझॉन कडून भारतात करण्यात येत असलेल्या 2800 कोटी रुपयांपेक्षा (~यूएसडी 300 मिलियन) अधिक गुंतवणुकीचा एक भाग आहे. या गुंतवणुकीचा उद्देश सहकाऱ्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि आर्थिक कल्याण अधिक मजबूत करणे तसेच भारतातील सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह ऑपरेशन्स नेटवर्क अधिक सक्षम करणे हा आहे.तुमच्या पिनकोडमध्ये ही सेवा उपलब्ध आहे का हे तपासण्यासाठी Amazon.in अॅप उघडा आणि वरच्या बॅनरमध्ये ‘लाइटनिंग’ नाऊ आयकॉन शोधा.

War Impact on Sweets: आईक्रीम-चॉकलेट लवर्सना झटका! इराण युद्धामुळे ‘स्वीट डिश’ महागल्या, Trump यांच्यामुळे भडकणार किमती ?

Web Title: Amazon now delivery service expansion 100 cities india details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • amazon
  • Business News

संबंधित बातम्या

‘ग्राहकांसाठी ‘Digital Banking Point 2.0’ अन् व्यापाऱ्यांसाठी ‘AI…; ॲक्सिस बँकेची नवी भरारी
1

‘ग्राहकांसाठी ‘Digital Banking Point 2.0’ अन् व्यापाऱ्यांसाठी ‘AI…; ॲक्सिस बँकेची नवी भरारी

पर्यावरणासाठी Amazon चे मोठे पाऊल! पुण्याच्या ‘NCL’ कॅम्पसमध्ये दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाणी पुनर्भरण प्रकल्प
2

पर्यावरणासाठी Amazon चे मोठे पाऊल! पुण्याच्या ‘NCL’ कॅम्पसमध्ये दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाणी पुनर्भरण प्रकल्प

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील
3

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
4

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.