Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Insurance: अमित शाह यांची मोठी घोषणा! LIC नंतर आता CLIC ची मार्केटमध्ये एन्ट्री; काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन?

सहकारिता क्षेत्रातून विमा क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणणारा निर्णय समोर आला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एका नवीन विमा कंपनीची घोषणा केली आहे, जिचे नाव 'क्लिक' असणार आहे. ही कंपनी LIC पर्याय नसून, सहकार क्षेत्रातील लोकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 06:23 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमित शाह यांची मोठी घोषणा!
  • LIC नंतर आता CLIC ची मार्केटमध्ये एन्ट्री
  • काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन?
सहकारिता क्षेत्रातून विमा क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणणारा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार मंत्रालयाने सोमवारी आपला पाचवा स्थापना दिवस साजरा केला. याप्रसंगी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एका नवीन विमा कंपनीची घोषणा केली आहे, जिचे नाव ‘क्लिक’ असणार आहे. ज्यामुळे सहकारी संस्थांना फायदा होईल असे आश्वासन देण्यात आलं आहे. ही विमा कंपनी पूर्णपणे ‘भारत टॅक्सी’च्या धर्तीवर आधारित असणार आहे. LIC नंतर आता CLIC चं नेमकं प्रकरण काय?

Football फॅन्सना Swiggy कडून भेट! लाँच केली Late Night Eats सर्व्हिस, काय आहे खास?

विमा कंपनीचा भारत टॅक्सीशी संबंध!

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी CLIC नावाच्या जीवन विमा कंपनीची घोषणा केली. ही कंपनी सहकारी संस्थांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवेल. शाह म्हणाले, “भारतात अंदाजे ८.५ लाख सहकारी संस्था असून, ३० कोटींहून अधिक सदस्य आहेत.” त्यांनी असेही सांगितले की, ‘भारत टॅक्सी’ या सहकारी कॅब सेवा मॉडेलच्या यशामुळे ही विमा कंपनी त्याच धर्तीवर तयार केली जाईल. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की,”आम्ही भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी क्षेत्रात एक जीवन विमा कंपनी स्थापन करणार आहोत. यामुळे विमा क्षेत्रात सहकारी संस्थांच्या विकासाला मदत होईल.”

नवीन विमा कंपनीचे फायदे काय?

अमित शाह यांनी असेही सांगितले की, ही नवीन जीवन विमा कंपनी स्थापन झाल्यावर, सुमारे ३० कोटी सहकारी सदस्यांना विमा सेवा सहज उपलब्ध होतील. याचा फायदा देशभरातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांशी PACS संबंधित असलेल्या लाखो शेतकऱ्यांना होईल. त्यांना आता मोठ्या शहरांमध्ये किंवा बँकांमध्ये जाण्याची गरज न भासता, थेट त्यांच्या जवळच्या सहकारी केंद्रातून विमा पॉलिसी खरेदी करता येतील आणि त्यावर दावा करता येईल.

‘भारत टॅक्सी’चा विस्तार होणार

या कार्यक्रमादरम्यान, अमित शाह यांनी असेही सांगितले की, देशभरातून ‘भारत टॅक्सी’ला मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. शाह यांच्या मते, सहकारी मॉडेल अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘भारत टॅक्सी’ या कॅब सेवा प्लॅटफॉर्मने चांगली कामगिरी केली असून, पुढील दोन वर्षांत ५०० शहरांमध्ये तिचा विस्तार केला जाईल. सध्या, भारत टॅक्सीमध्ये ६.३७ लाख नोंदणीकृत चालक आणि ३५.७७ लाख नोंदणीकृत ग्राहक आहेत. परिणामी, भविष्यात इतर नवीन शहरांमध्येही तिचा विस्तार होईल.

इंडोनेशियाला जायचा प्लॅन करताय? मग टेन्शन मिटलं! तिथेही फक्त QR कोड स्कॅन करा अन् UPI ने करा पेमेंट

Web Title: Amit shahs announcement after lic clic is now the governments master plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Amit Shah
  • amit shaha
  • Business News
  • Government
  • LIC
  • Marathi News

संबंधित बातम्या

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
1

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
2

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
3

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक
4

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.