Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल अंबानींचा मोठा डाव; रिलायन्स पॉवरला मिळाला भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्प

उद्योगजक अनिल अंबानी याच्या रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एनयू सनटेकला भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचा  लेटर ऑफ अर्वाड मिळाले आहे. जाणून घ्या या प्रकल्पाबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Dec 19, 2024 | 06:42 PM
अनिल अंबानींचा मोठा डाव; रिलायन्स पॉवरला मिळाला भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्प
Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स पॉवर लिमिटेडची (रिलायन्स पॉवर) उपकंपनी असलेल्या रिलायन्स एनयू सनटेक प्रायव्हेट लिमिटेडला (रिलायन्स एनयू सनटेक) भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचा  लेटर ऑफ अर्वाड मिळाले आहे. या प्रकल्पात ९३० मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प आणि  ४६५ मेगावॅट/१८६० मेगावॅटवर क्षमतेच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमचा समावेश आहे.  (बीईएसएस अर्थात बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली), भारतीय सौरऊर्जा महामंडळाकडून (एसईसीआय) कंपनीला लेटर ऑफ अवॉर्ड (एलओए) प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प प्राप्त झाल्याने अनिल अंबांनींच्या  कंपनीला मिळालेले हे  मोठे यश आहे.

‘या’ एरोस्पेस कंपनीचा आयपीओ 23 डिसेंबरला येणार बाजारात ; प्राईस बँड 745 रुपये ते 785 रुपये

ग्रिड स्टोरेज बॅटरी स्थापित केल्या जाणार

या प्रकल्पात ग्रिड स्टोरेज बॅटरी स्थापित केल्या जाणार असून, भारतातीलच नव्हे, तर चीन वगळता उर्वरित आशियामधील एका ठिकाणी केली जाणारी ही सर्वांत मोठी स्थापना असेल. दिवसातील ४ तास विजेचा पूर्णक्षमतेने खात्रीशीर तसेच स्पर्धात्मक दराने पुरवठा झाल्यास डिसकॉम्ससाठी (वीज पुरवठा करणारी खाजगी वितरण कंपनी) तो मोठा दिलासा ठरणार आहे. सध्या डिसकॉम्सना वीजवापर पूर्ण भरात असलेल्या तासांमध्ये ऊर्जा विनिमय केंद्रांकडून १० रुपये प्रति एककापर्यंत दराने सातत्याने वीजखरेदी करावी लागत आहे.

रिलायन्स एनयू सनटेकने, ९ डिसेंबर २०२४ रोजी घेतल्या गेलेल्या ई-रिव्हर्स लिलावामध्ये, भारतीय सौरऊर्जा महामंडळाकडून (एसईसीआय) बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह (बीईएसएस) ९३० मेगावॅट क्षमतेचा महत्त्वपूर्ण सौरऊर्जा प्रकल्प, यशस्वीरित्या प्राप्त केला.

निविदेतील अटींनुसार, रिलायन्स एनयू सनटेक सौरऊर्जेद्वारे भारित केली जाणारी ४६५ मेगावॅट/१,८६० मेगावॅटअवर किमान क्षमतेची साठवण प्रणालीही स्थापित करणार आहे.आंतरराज्यीय पारेषण प्रणालीतील (आयएसटीएस) एकूण २,००० मेगावॅट क्षमतेचे संलग्न सौरऊर्जा प्रकल्प व त्यासह १,००० मेगावॅट/४,००० मेगावॅटअवर क्षमतेच्या ऊर्जा साठवण प्रणालींसाठी पाच कंपन्या प्रयत्न करत होत्या. त्यात भारतातील आघाडीच्या वीजनिर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स एनयू सनटेक कंपनीने सर्वाधिक वैयक्तिक वितरण (इंडिव्हिज्युअल अलोकेशन) प्राप्त केले.

सौरऊर्जा हा किफायतशीर पर्याय कंपनीने विकसित केला

बीईएसएसने भारतात सौरऊर्जेच्या क्षेत्रात केलेली तंत्रज्ञानात्मक प्रगती रिलायन्स एनयू सनटेकच्या या यशामुळे अधोरेखित झाली आहे. नवीनीकरणीय ऊर्जेच्या पर्यायांमध्ये सौरऊर्जा हा किफायतशीर पर्याय कंपनीने विकसित केला आहे. दररोज सर्वाधिक वीजवापराच्या काळात चार तास वीजपुरवठ्याची (किंवा चार तासांचा डिस्चार्ज कालावधी) हमी या प्रकल्पामुळे मिळणार आहे.एसईसीआय रिलायन्स एनयू सनटेकशी २५ वर्षांच्या कालावधीसाठी वीजखरेदी करार (पीपीए) करणार आहे आणि ही खरेदी केलेली वीज भारतातील अनेकविध डिसकॉम्सना विकली जाणार आहे. रिलायन्स एनयू सनटेक या प्रकल्पाचा विकास बिल्ड-ओन-ऑपरेट (बांधा-मालकी घ्या-चालवा) या तत्त्वावर करणार आहे.

मॅग्मा एचडीआयची इंडोस्टार कॅपिटल फायनान्सबरोबर भागीदारी; वाहन, आरोग्य,व्यावसायिक विमा सुलभता वाढवण्याचे लक्ष्य

Web Title: Anil ambanis reliance power gets indias largest solar and battery storage project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 06:42 PM

Topics:  

  • anil ambani
  • Reliance Power
  • Solar Project

संबंधित बातम्या

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट
1

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट

संकटकाळात Anil Ambani ला दिलासा! 11 वर्ष जुन्या वादात विजय; खात्यात जमा होणार रू 28481 कोटी, शेअर्स चढणार
2

संकटकाळात Anil Ambani ला दिलासा! 11 वर्ष जुन्या वादात विजय; खात्यात जमा होणार रू 28481 कोटी, शेअर्स चढणार

अनिल अंबानी पोहोचले ईडी कार्यालयात, १७,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज चौकशी
3

अनिल अंबानी पोहोचले ईडी कार्यालयात, १७,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज चौकशी

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ३००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यात ईडीने केली पहिली अटक, चौकशीसाठी समन्स जारी
4

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ३००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यात ईडीने केली पहिली अटक, चौकशीसाठी समन्स जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.