युनीमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरींग लिमिटेड कंपनीने आयपीओ समभाग खुल्या विक्रीसाठी प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 745/- ते रु 785/- दरम्यान निश्चित केला आहे. विक्रीस काढण्यात आलेल्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु. 5/- आहे.कंपनीचा प्रस्तुत आयपीओ अथवा ऑफर सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणूक बोलीसाठी खुली होईल व गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. इच्छुक गुंतवणूकदार किमान 19 समभागांच्या लॉट साठी व त्यापुढे 19 समभागांच्या पटीत गुंतवणूक बोली लावू शकतील.
भांडवलाची उभारणी आणि त्याचा वापर
आयपीओ नवे शेअर आणि ऑफर फॉर सेल यांचे मिश्रण असून नव्या शेअरच्या माध्यमातून 2500 दशलक्ष रुपये भांडवल उभारण्यात येणार आहे. तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत देखील 2500 दशलक्ष रुपये मूल्याचे समभाग विक्रीस काढण्यात आले आहेत. नव्या शेअर विक्रीतून उभारणाऱ्या भांडवलापैकी 363.66 दशलक्ष रुपये भांडवली खर्च म्हणून वापरण्यात येणार आहेत. यातून कंपनीसाठी मशिनरी व उपकरणे खरेदी करुन व्यवसाय विस्तार करण्यात येणार आहे. तसेच 252.85 दशलक्ष रुपये रक्कम खेळते भांडवल म्हणून वापरण्यात येणार आहे. तसेच 438.91 दशलक्ष रुपये रक्कम मटेरियल उपकंपनीच्या विस्तारासाठी भांडवली खर्च म्हणून वापरण्यात येणार असून त्यातून मशिनरी व उपकरण खरेदी केली जाणार आहे. तसेच 447.15 दशलक्ष रुपये रक्कम मटेरियल उपकंपनीच्या भांडवली खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. यातून देखील मशिनरी व उपकरण खरेदी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे 400 दशलक्ष रुपये रक्कम मटेरियल उपकंपनीवरील कर्ज पतरफेड/मुदतपूर्वफेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे.
युनीमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरींग लिमिटेडबद्दल
युनीमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरींग लिमिटेड या इंजिनिअरींग सोल्यूशन्स कंपनीची स्थापना 2016 साली करण्यात आली होती. एरोस्पेस, डिफेन्स, एनर्जी व सेमीकंडक्टर उद्योगातील कंपन्यांना लागणारे अत्यंत महत्वाचे सुटे भाग जसे एरो टुलिंग, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट, इलेक्ट्रो-मेकॅनिकल सब असेम्ब्लीज व अन्य महत्वाचे अभियांत्रिकी सुटे भांग पुरवण्याच्या उद्देशाने कंपनीची स्थापना करण्यात आली होती.
देशातील प्रमुख ओईएम कंपन्यांना व त्यांच्या जगभरातील परवानाधारक कंपन्यांना अत्यंत महत्वाचे अत्युच्य अचूकतेचे सुटे भाग पुरवणे कंपनीचे मुख्य काम आहे. त्यासाठी कंपनीकडे बिल्ड टू प्रिंट आणि बिल्ड टू स्पेसिफिकेशन्स क्षमता आहे.
कंपनीची उत्पादने
युनीमेक कंपनीच्या उत्पादनांमध्ये इंजिन लिफ्टिंग अँड बॅलन्स बीम, असेम्ब्ली, डिसअसेम्ब्ली व कॅलिबरेशन टुलिंग, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट, एअरफ्रेम असेम्ब्ली प्लॅटफॉर्म, इंजिन ट्रान्सपोर्टेशन स्टँड्स, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रोमेकॅनिकल टर्नकी सिस्टिम्स, व तंतोतंत सुटेभाग यांचा समावेश आहे.
कंपनी बेंगळुरु शहरात असून जागतिक एरोस्पेस, डिफेन्स, सेमी कंडक्टर,व एनर्जी ओईएम आणि त्यांच्या परवानाधारक कंपन्यांच्या पुरवठा साखळीची एक महत्वाचा भाग आहे. या कंपन्यांना एरो टुलिंग, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट, इलेक्ट्रो-मेकॅनिकल सब-असेब्लीज आणि अन्य तंतोतंत जुळणारे अभियांत्रिकी सुटे भाग या उत्पादनांचा पुरवठा कंपनीकडून केला जातो.आनंद राठी ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. तसेच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी आयपीओ इश्यूची रजिस्ट्रार कंपनी आहे.
आयपीओ ऑफर
ही आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारा करण्यात येत आहे. ऑफर पैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग गुणोत्तरानुसार अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. त्याचप्रमाणे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तसेच या ऑफर मध्ये कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात समभाग राखून ठेवण्यात आले आहेत.