भारतातील जनरल इन्शुरन्स क्षेत्रात वेगाने वाढणारी कंपनी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सने प्रमुख नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड (आयसीएफएल) बरोबर धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.कॉर्पोरेट एजंट करारावर स्वाक्षरीसाठी मुंबईत विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. करारावरील स्वाक्षरीप्रसंगी इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन श्रीनिवासन आणि मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजीव कुमारस्वामी तसेच दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उच्च दर्जाच्या सुविधा आणि विमा संरक्षण
या करारांतर्गत इंडोस्टार कॅपिटल फायनान्स आता आपल्या ग्राहकांना मॅग्मा एचडीआयचे आरोग्य, व्यावसायिक आणि वाहन विमा योजनांचे पर्याय सादर करणार आहे. एकाच छताखाली ग्राहकांना उच्च दर्जाच्या सुविधा प्रदान करण्याबरोबरच विमा संरक्षण सुनिश्चित करताना ही भागीदारी ग्राहकांना सर्वसमावेशक आर्थिक सेवा प्रदान करण्याबाबत उभय कंपन्यांच्या वचनबद्धतेला महत्व देते.
आमच्या दृष्टीकोनाशी ही भागीदारी अतिशय सुसंगत
करारावरील स्वाक्षरी सोहळ्याप्रसंगी बोलताना इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन श्रीनिवासन म्हणाले, “आमच्या ग्राहकांना सर्वांगीण वित्तीय सेवा देण्याबाबत असलेल्या आमच्या दृष्टीकोनाशी ही भागीदारी अतिशय सुसंगत आहे. आमच्या आर्थिक पर्यांयांसोबत विमा योजना सादर करताना आमच्या ग्राहकांना त्यांच्या मालमत्ता आणि हितासाठी अखंड, विश्वासार्ह संरक्षण प्रदान करत त्यांना अधिक सक्षम बनवण्याचा आमचा हेतू आहे.
ही भागीदारी ग्राहकांना अधिकाधिक सेवा प्रदान करण्यास सक्षम करते
हीच भूमिका अधोरेखित करताना मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजीव कुमारस्वामी म्हणाले, ” इंडोस्टार कॅपिटल फायनान्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कारण आम्ही लक्ष केंद्रीत केलेल्या ग्राहकांमुळे आम्हाला इंडोस्टारबरोबर एक भक्कम समन्वय दिसतो. इंडोस्टारची बाजारातील व्यापक पोहोच आणि जोखीम अंडरराइटिंगमध्ये आमचे कौशल्य या दोन्ही घटकांचा मिलाफ घडवताना उभय कंपन्यांतील ही भागीदारी आम्हाला एकत्रितपणे ग्राहकांना अधिकाधिक सेवा प्रदान करण्यास सक्षम करत आहे. एकमेकांच्या सहकार्यातून विविध वित्तीय योजनांची उपलब्धता वाढवण्याबरोबरच ग्राहकाभिमुख पर्याय विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
सनोती प्रॉपर्टीज एलएलपी, अदार पूनावाला (90%) आणि रायझिंग सन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड (10%) यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीमध्ये 72.491% हिस्सा आहे. विविध श्रेणींमध्ये ७० हून अधिक उत्पादनांसह, कंपनीकडे सामान्य विमा क्षेत्रातील सर्व प्रमुख जोखमी सुरक्षित करण्यासाठी उपाय दिले जातात. मोटार (कार, दुचाकी, व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर), आरोग्य, वैयक्तिक अपघात आणि घर यासारख्या किरकोळ विमा ते अग्निशमन, अभियांत्रिकी, दायित्व, मरीन यासारख्या व्यावसायिक विमा उत्पादने दिली जातात.