
कशाशी संबंधित आहे हे प्रकरण?
हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) आणि यस बँक (Yes Bank) यांच्याशी जोडलेल्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. यापूर्वीही ईडीने या प्रकरणात ₹१४५२ कोटी आणि ₹७५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
Reliance Anil Ambani Group: Cumulative Group Attachment Reached Rs 10,117 Crore. ED has provisionally attached over 18 properties, Fixed Deposits, Bank Balance and Shareholding in Unqouted Investments of Reliance Anil Ambani Group worth Rs.1,120 Crore in Reliance Home Finance… pic.twitter.com/m7zC6Yytgi — IANS (@ians_india) December 5, 2025
ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अनेक कंपन्यांच्या मालकीच्या मालमत्तांचा समावेश आहे:
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड: ७ मालमत्ता
रिलायन्स पॉवर लिमिटेड: २ मालमत्ता
रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड: ९ मालमत्ता
तसेच, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स व्हेंचर ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स फि मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स आधार प्रॉपर्टी कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स गेम्स इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेल्या मुदत ठेवी (FD) आणि बँक शिल्लक यांचा समावेश आहे. यासोबतच सूचीबद्ध नसलेल्या गुंतवणुकीतील हिस्सेदारीही जप्त करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: Anil Ambani गोत्यात! ईडीची धडक कारवाई; 1,400 कोटींची मालमत्ता जप्त; सुप्रीम कोर्टाने…
कधीचे आहे हे प्रकरण?
२०१७-२०१९ या काळात यस बँकेने RHFL इन्स्ट्रुमेंट्समध्ये ₹२,९६५ कोटी आणि RCFL इन्स्ट्रुमेंट्समध्ये ₹२,०४५ कोटींची गुंतवणूक केली होती. डिसेंबर २०१९ पर्यंत या गुंतवणुका नॉन-परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट (Non-Performing Investment) बनल्या. RHFL साठी ₹१,३५३.५० कोटी आणि RCFL साठी ₹१,९८४ कोटी रुपये येणे बाकी होते. ईडीच्या तपासानुसार RHFL आणि RCFL ला ₹११,००० कोटींपेक्षा अधिक सार्वजनिक निधी प्राप्त झाला. यस बँकेने हा पैसा रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवण्यापूर्वी, बँकेला पूर्वीच्या रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडातून मोठा निधी मिळाला होता.
‘सेबी’ नियमांना फाटा देऊन ‘सर्किटस रूट’
ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की, सेबीच्या (SEBI) नियमांमुळे रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंड थेट या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकत नव्हता. त्यामुळे निधीला यस बँकेच्या माध्यमातून ‘सर्किटस रूट’ वापरून समूहाच्या कंपन्यांपर्यंत पोहोचवले गेले. सी.बी.आय. (CBI) ने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर, ईडीने आरकॉम (RCOM), अनिल अंबानी आणि इतरांविरुद्धही तपास सुरू केला आहे.
आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य किती?
ईडीने म्हटले आहे की या कारवाईनंतर, अनिल अंबानी समूहाकडून जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य आता ₹१०,११७ कोटी झाले आहे. यापूर्वी, एजन्सीने रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम), आरएचएफएल आणि आरसीएफएलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणांमध्ये ₹८,९९७ कोटींची मालमत्ता जप्त केली होती.