Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दणका… 50000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, Auto Industry मध्ये मोठी खळबळ! प्लांटही होणार बंद; नेमके कारण काय?

Auto Industry Layoffs : जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी आणि वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी एका प्रसिद्ध बड्या कार निर्मिती कंपनीने तब्बल ५०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासोबतच कंपनी आपले काही मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कायमचे बंद करणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 04, 2026 | 11:51 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑटो जगतात मोठी खळबळ!
  • कार कंपनी ५०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
  • मोठे प्लांटही होणार बंद
Auto Industry Layoffs :  जगभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढती मंदी आणि वाढत्या खर्चाचा दणका आता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. एक प्रसिद्ध बड्या कार निर्मिती कंपनीने तब्बल 50000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासोबतच कंपनी आपले काही मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांटदेखील कायमचे बंद करण्याच्या मार्गावर आहे. ऑटोमोबाईल जगतातील ही सगळ्यात मोठी नोकरी कपात आहे. नेमकी कोणती कंपनी आहे जी हा एवढा मोठा निर्णय घेतेय आणि नेमकं काय आहे मुख्य कारणं? ( Auto Industry Layoffs ) 

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक असलेल्या Volkswagen ने खर्चात कपात करण्याच्या एका मोठ्या योजनेला मंजुरी दिली आहे. यानुसार कंपनीने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने अंदाजे ५०,००० नोकऱ्या कमी करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या मोठ्या निर्णयासोबतच जर्मनीमधील सुरु असलेल्या चार प्रमुख प्रकल्पांमधील उत्पादन थांबवलं जाणार आहे.

का घेतला हा मोठा निर्णय?

Volkswagen सध्या बऱ्याच मोठ्या मोठ्या आव्हानांना समोरी जात आहे. मुख्य म्हणजे चिनी बाजारपेठेत कमी किमतीच्या कार उत्पादकांनामुळे कंपनीला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यासह अमेरिकेने लादलेले टॅक्स आणि युरोपमधील अतिरिक्त उत्पादन क्षमता यामुळे कंपनीच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये कंपनीला तरुन जाणं कठीण आहे. त्यासाठी खर्च कमी करण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.

जर्मनीतील चार प्लांट्सवर संकट

कंपनी घेतलेल्या निर्णयात जर्मनीतील चार प्लांट्समधील उत्पादन थांबवण्याचा मोठा निर्णय आहे. यामध्ये एमडेन, झ्विकाऊ, हॅनोव्हर आणि नेकार्सुलम यांचा समावेश आहे. फोक्सवॅगनला युरोपमधील आपली उत्पादन क्षमता देखील कमी करायची आहे.

कार मॉडेल्सची संख्याही कमी होणार

नोकऱ्या कमी करणे आणि कारखान्यांमध्ये बदल करण्यासोबतच, कंपनी आपल्या मॉडेल्सची संख्या कमी करण्याची तयारी करत आहे. फोक्सवॅगन आपल्या कार मॉडेल्सची संख्या जवळपास निम्म्याने कमी करण्याची योजना आखत आहे. कमी, पण जास्त विक्री होणाऱ्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हा यामागील उद्देश आहे.

Volkswagen ची ही योजना कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक मानली जात आहे. या नवीन योजनेअंतर्गत, कंपनी खर्च कमी करण्याचा, उत्पादन अधिक कार्यक्षम बनवण्याचा आणि बदलत्या जागतिक वाहन बाजारात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनी नव्याने पुन्हा मार्केटमध्ये उतरण्याचा प्लॅन आखत आहे.

यापूर्वी कधी करण्यात आली होती कर्मचारी कपात ?

Volkswagen ने मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, कंपनीने ५०,००० नोकऱ्या कमी करण्यावर होकार दर्शवला होता. आता, या नवीन ५०,००० नोकऱ्यांच्या समावेशामुळे, एकूण कपात १,००,००० पर्यंत पोहोचू शकते. हे पाऊल वाहन उद्योगातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीला दर्शवतो. चिनी कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा, घटती मागणी, आयात शुल्क आणि अतिरिक्त उत्पादन क्षमता यांसारख्या आव्हानांमुळे प्रमुख वाहन कंपन्यांवर दबाव वाढत आहे.

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा

Web Title: Auto industry company to lay off 50000 employees marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Automobile company
  • layoffs
  • Volkswagen

संबंधित बातम्या

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार
1

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार

Zomato Layoff : झोमॅटोचा कर्मचाऱ्यांना मोठा दणका! थेट 240 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता, काय नेमकं कारण?
2

Zomato Layoff : झोमॅटोचा कर्मचाऱ्यांना मोठा दणका! थेट 240 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता, काय नेमकं कारण?

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!
3

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.