
Bajaj Finance FD Interest Hike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Bajaj Finance FD Interest Hike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Bajaj Finance FD Interest Rate Hike: देशातील अग्रेसर नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या फिक्सड् डिपॉझिट च्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे. कंपनीने १२ ते ६० महिन्यांच्या सर्व मुदतींसाठी व्याजदरामध्ये १५ ते ४० बेसिस पॉईंट्सची वाढ केली असून, हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे ठेवीदारांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. Bajaj Finance FD
या नवीन बदलांनुसार, सर्वसामान्य नागरिक ३१ ते ६० महिन्यांच्या मुदतीसाठी नवीन ठेवींवर आता वार्षिक ७.७५ टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळवू शकतात. याआधी हा दर ७.४० टक्के होता. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना आता सर्व मुदतींवर मूळ दरापेक्षा अतिरिक्त ०.४० टक्के जास्त व्याज मिळणार असून, ३१ ते ६० महिन्यांच्या ठेवींवर त्यांना ८.१५ टक्क्यांपर्यंतचा उच्चांकी परतावा मिळू शकेल. Bajaj Finance
विशेष म्हणजे, ज्या ग्राहकांची मुदत संपलेली ठेव नूतनीकरण करायची आहे, त्यांना अतिरिक्त ०.१० टक्के वार्षिक फायदा मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ८.२५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
याविषयी बोलताना बजाज फायनान्सचे डिपॉझिट्स आणि वेल्थ मॅनेजमेंटचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष सचिन सिक्का म्हणाले की, “निश्चित परतावा शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्सड् डिपॉझिट हे नेहमीच बचतीचे एक महत्त्वाचे साधन राहिले आहे. आम्ही दीर्घकालीन मुदतीवर अधिक भर दिला आहे, जेणेकरून ठेवीदार पाच वर्षांपर्यंत उच्च परतावा मिळवू शकतील. आमची ही ट्रिपल-ए मानांकित ठेव ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांत उघडता येते.”
बजाज फायनान्सच्या या ठेवींला CRISIL आणि ICRA कडून ‘AAA/Stable’ मानांकन मिळाले असून, यामध्ये किमान १५,००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. ग्राहक ऑनलाईन किंवा कंपनीच्या शाखांद्वारे या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.