Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Holiday July 2026: जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका! आताच लिस्ट पाहून घ्या नाहीतर महत्त्वाची खोळंबतील कामे

जुलै २०२६ या आगामी महिन्यात लागोपाठ येणारे सण, राष्ट्रीय सुट्ट्या आणि शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. जर तुमची बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे प्रलंबित असतील, तर ती वेळेत पूर्ण करण्यासाठी ही सुट्ट्यांची यादी आधीच तपासून घेणे फायद्याचे ठरेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 04:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bank Holiday : बँकेच्या सुट्ट्यांची यादी दर महिन्याला बदलते. पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये, देशभरात बँका एकूण १२ दिव स बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या नियमित ठरलेल्या सुट्ट्या, तसेच राज्य सण आणि विशेष प्रसंग या सगळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे, बँकेमध्ये जाण्यापूर्वी, तुमच्या शहरात बँक उघडी आहे की नाही हे नक्की चेक करुन जा.

Elon Musk यांच्यानंतर ‘हा’ भारतीय व्यक्ती जगातील सर्वात महागडा CEO! दररोज कमवतो तब्बल 21 कोटी रुपये

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यात अनेक राज्यांमध्ये बँका महत्त्वाच्या तारखांना बंद राहणार आहेत. पण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा या सुट्ट्यांमध्ये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे, ग्राहकांनी चेक जमा करणे, रोख व्यवहार किंवा इतर महत्त्वाची बँकिंग कामे आगाऊ पूर्ण करणे शहाणपणाचे ठरेल.

जुलैमध्ये बँका कधी राहतील बंद?

जुलै २०२६ मध्ये, देशभरात बँका चार रविवारी बंद राहतील: ५, १२, १९ आणि २६ जुलै या तारखांना रविवार असल्याने यादिवशी बँका बंद राहतील. याव्यतिरिक्त, दुसऱ्या शनिवारमुळे ११ जुलै रोजी आणि चौथ्या शनिवारमुळे २५ जुलै रोजी सर्व बँक शाखा बंद राहतील. काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि विशेष प्रसंगांसाठी अतिरिक्त सुट्ट्या पाळल्या जातील. मोहरम निमित्त अनेक राज्यांमध्ये ६ जुलै रोजी बँका बंद राहतील. मेघालयात ९ जुलै रोजी बेह दिंकलाम, ओडिशा आणि मणिपूरमध्ये १६ जुलै रोजी रथयात्रा, मेघालयात १७ जुलै रोजी यू तिरोट सिंग यांची पुण्यतिथी आणि त्रिपुरामध्ये २२ जुलै रोजी खारची पूजा या निमित्ताने बँकेच्या शाखा बंद राहतील.

सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या

आरबीआयच्या बँक सुट्ट्यांची यादी देशभरात एकसारखी नाही. काही सुट्ट्या राष्ट्रीय स्तरावर लागू होतात, तर काही विशिष्ट राज्यांपुरत्या मर्यादित असतात. त्यामुळे, एका राज्यात बँका बंद असलेला दिवस दुसऱ्या राज्यात सुट्टीचा असेलच असे नाही. म्हणून, बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्याच्या सुट्ट्यांची यादी नक्की तपासा. संपूर्ण माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर, मोबाइल ॲपवर किंवा आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरवर मिळू शकते. यामुळे तुमच्या अनावश्यक फेऱ्या वाचतील.

सुट्ट्यांपूर्वी महत्त्वाची कामे करून घ्या

जर तुम्हाला रोख रक्कम जमा करायची असेल, चेक वटवायचा असेल, डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल किंवा कर्जाचा हप्ता भरायचा असेल, तर ही कामे सुट्ट्यांपूर्वी पूर्ण करा. सलग सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखांमध्ये गर्दी वाढू शकते आणि काही सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. पणऑनलाइन बँकिंग, यूपीआय, मोबाइल बँकिंग आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील. जर तुम्ही जुलै महिन्यात प्रवास करणार असाल किंवा मोठी रक्कम देण्याची योजना आखत असाल, तर तुमच्याकडील रोख रक्कम आणि आवश्यक बँकिंग व्यवस्था आगाऊ तपासून घ्या.

FD धारकांसाठी Good News! ‘या’ बँकेत पैसे ठेवल्यास मिळणार तब्बल 8.5 टक्क्यांपर्यंत रिटर्न; पाहा नवीन व्याजदर

Web Title: Bank holidays july 2026 complete list rbi calendar see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Bank
  • bank close
  • Bank Holiday
  • bank RBI
  • Internet banking

संबंधित बातम्या

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न
1

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
2

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
4

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.