Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exim Bank Recruitment 2026: तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! एक्झिम बँकेत १२० पदांची भरती, वार्षिक ३० लाखांपर्यंत पॅकेज

Exim Bank Recruitment 2026: भारतीय निर्यात-आयात बँक अर्थात एक्झिम बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर पदांच्या एकूण १२० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ९० आणि मॅनेजरच्या ३० जागांचा समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 20, 2026 | 06:25 PM
Exim Bank Recruitment 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Exim Bank Recruitment 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एक्झिम बँकेत १२० पदांसाठी मेगा भरती.
  • मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर पदांसाठी अर्जाची संधी.
  • वार्षिक २५ ते ३० लाखांपर्यंत पॅकेज.

भारतीय निर्यात-आयात बँकेने म्हणजे एक्झिम बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर या पदांच्या थेट भरतीसाठी जाहिरात काढलीय.या भरतीमध्ये एकूण 120 जागांसाठी अर्ज मागवलेत. 27 नोव्हेंबर 2026 पासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करायची आणि परीक्षा फी भरायची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 आहे. तर लेखी परीक्षा डिसेंबर 2026 मध्येच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. Exim Bank Recruitment 2026:

कोणत्या पदाला किती जागा?

या भरतीत मॅनेजमेंट ट्रेनीच्या एकूण 90 जागा आणि मॅनेजर पदाच्या एकूण 30 जागा आहेत. मॅनेजमेंट ट्रेनीसाठी बँकिंग ऑपरेशन्स, ट्रेझरी अँड अकाऊंट्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनल ऑडिट, कॉम्प्लायन्स, ईएसजी, रिस्क मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी, लीगल, डिजिटल टेक्नॉलॉजी, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, अॅडमिनिस्ट्रेशन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अशा वेगवेगळ्या विभागात जागा आहेत.

मॅनेजर पदासाठी क्रेडिट अप्रायझल, लोन ऑपरेशन्स, स्पेशल सिच्युएशन्स ग्रुप / रिकव्हरी, रिस्क मॅनेजमेंट, कॉम्प्लायन्स, इंटरनल ऑडिट, एमएसएमई, सस्टेनेबल एंटरप्राइज अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स / सीएसआर या विभागात भरती होणार आहे.

शिक्षण किती लागेल?

संबंधित पदांनुसार कमीत कमी 60 टक्के गुणांसह पदवी आणि पदव्युत्तर पदवी, सीए, आयसीएसआय किंवा सीआयएसए असं शिक्षण ठरवलंय. मॅनेजर पदासाठी संबंधित क्षेत्रात कमीत कमी 4 वर्षांचा अनुभव लागेल. 1 नोव्हेंबर 2026 रोजी मॅनेजमेंट ट्रेनीसाठी वय 21 ते 28 वर्षे आणि मॅनेजरसाठी 24 ते 30 वर्षे असावं. राखीव वर्गाला नियमानुसार वयात सूट मिळेल.

पगार किती मिळणार?

मॅनेजमेंट ट्रेनींना एक वर्षाच्या ट्रेनिंग काळात दरमहा 65000 रुपये स्टायपेंड मिळेल. ट्रेनिंग नीट पूर्ण केल्यावर त्यांची डेप्युटी मॅनेजर (जेएम-1) पदावर नेमणूक होईल. त्यांचा सुरुवातीचा वार्षिक सीटीसी अंदाजे 25 लाख रुपये असेल. मॅनेजर पदासाठी सुरुवातीचा वार्षिक सीटीसी अंदाजे 30 लाख रुपये राहील. मॅनेजमेंट ट्रेनींना 3 लाख रुपयांचा पर्सनल बाँड भरावा लागेल. तर मॅनेजरसाठी कमीत कमी 3 वर्षांच्या सेवेचा बाँड लागू राहील.

निवड कशी होणार?

निवड लेखी परीक्षा आणि पर्सनल मुलाखतीने होईल. लेखी परीक्षेला 70 टक्के आणि मुलाखतीला 30 टक्के वेटेज राहील. लेखी परीक्षा चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली इथे होईल. तर मुलाखती मुंबई किंवा नवी दिल्ली इथे घेतल्या जातील.

फी किती?

जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 600 रुपये फी आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवारांना फक्त 100 रुपये इंटीमेशन चार्जेस भरावे लागतील. उमेदवारांनी https://www.eximbankindia.in/careers या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा. आणि ठरलेल्या नियमानुसार फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि इंग्रजीतलं स्वयंघोषणापत्र अपलोड करावं. जर तुम्ही बँकेत नोकरीचं स्वप्न बघत असाल तर ही चांगली संधी आहे. शेवटच्या तारखेची वाट बघू नका, आधीच अर्ज करून टाका.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एक्झिम बँक भरती २०२६ मध्ये एकूण किती जागा आहेत?

    Ans: एकूण १२० जागा असून मॅनेजमेंट ट्रेनीच्या ९० आणि मॅनेजरच्या ३० जागा आहेत.

  • Que: एक्झिम बँक भरतीसाठी अर्ज कधी सुरू होणार आहे?

    Ans: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

  • Que: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: ११ डिसेंबर २०२६ ही अर्ज करण्याची आणि परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख आहे.

Web Title: Exim bank recruitment 2026 120 management trainee manager vacancies rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Bank
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?
1

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड
2

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

Bank Strike: ‘या’ बँकेचे कर्मचारी ३ डिसेंबरला संपावर! बँकेच्या खासगीकरणाला विरोध, नेमक्या मागण्या काय?
3

Bank Strike: ‘या’ बँकेचे कर्मचारी ३ डिसेंबरला संपावर! बँकेच्या खासगीकरणाला विरोध, नेमक्या मागण्या काय?

Canara Bank Home Loan: 60 लाखांचे गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? 25 वर्षांसाठी EMI किती, जाणून घ्या
4

Canara Bank Home Loan: 60 लाखांचे गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? 25 वर्षांसाठी EMI किती, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.