(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Paisabazaar.co नुसार, सर्वाधिक व्याजदरांसह SFBचे या विभागात वर्चस्व आहे, तर खासगी सेक्टर बँक आणि पब्लिक सेक्टर के बँक तुलनेने कमी व्याजदर देतात. जून २०२६ च्या नवीन अपडेटनुसार, Shivalik Small Finance Bank आणि Equitas Small Finance Bank ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडक कालावधीकरिता FD वर ८.५% पर्यंतचे सर्वाधिक व्याजदर देतात.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षे आणि एक दिवसाच्या ‘मॅक्सिमा एफडी’वर ८.५% पर्यंतचा सर्वाधिक व्याजदर देईल.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक २३ ते २७ महिन्यांसाठी ८.५% व्याजदर देतेय.
जना स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.३% व्याजदर देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ५ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.२५% पर्यंतचा व्याजदर देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ३ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.३०% पर्यंतचा व्याजदर देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ३ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.२५% पर्यंतचा व्याजदर देत आहे.
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने ८.५०% व्याजदराने १० लाख रुपये गुंतवले, तर त्यांना वार्षिक ८५,००० रुपयांपर्यंत व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीची सर्वात महत्त्वाची चिंता ही आहे की, जर त्यांच्या एफडीवरील परतावा एका आर्थिक वर्षात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त झाला, तर बँक TDS कापेल. हे टाळण्यासाठी, तुम्ही Form 15H भरणे आवश्यक आहे.






