Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of India BharatKosh Partnership: बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! भारतकोषसोबत हातमिळवणी, डिजिटल व्यवहार होणार सोपे

Bank of India BharatKosh Partnership: बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतकोष (NTRP) पोर्टलसोबत सहकार्य सुरू केले आहे. या भागीदारीअंतर्गत बँक आपल्या पेमेंट गेटवेद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी बिगर-कर महसूल संकलनाची डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 01:55 PM
Bank of India BharatKosh Partnership (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bank of India BharatKosh Partnership (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँक ऑफ इंडियाची भारतकोषसोबत भागीदारी
  • सरकारी शुल्क आणि दंड भरणे होणार डिजिटल
  • 24×7 ऑनलाइन पेमेंट सुविधेला मिळणार बळ

मुंबई, 18 नोव्हेंबर 2026: बँक ऑफ इंडियाने भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नॉन-टॅक्स रिसीट पोर्टल (NTRP), अर्थात ‘भारतकोष’ या एकात्मिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मसोबत सहकार्य सुरू केल्याची घोषणा केली आहे. या सहकार्यांतर्गत बँक अधिग्रहणकर्ता (Acquirer) म्हणून म्हणजेच बँकेच्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून बिगर-कर महसूल संकलनासाठी डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. Bank of India BharatKosh Partnership:

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये

नॉन-टॅक्स रिसीट पोर्टल (NTRP) हा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या लेखा महानियंत्रक कार्यालयाचा (CGA) एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या पोर्टलद्वारे नागरिक, व्यवसाय आणि विविध संस्थांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांना देय असलेले शुल्क, दंड आणि इतर बिगर-कर महसूल ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी एक एकीकृत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

हे पोर्टल भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांना एकमेकांशी जोडते. तसेच 24×7 ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देते. यामुळे सरकारी महसूल संकलन प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.

सुलभ डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध

भारतकोषसोबतच्या या सहकार्याद्वारे बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. त्याचबरोबर डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या भारत सरकारच्या संकल्पनेला हातभार लावण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

SBI Large Cap Fund: SIP करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! SBI च्या ‘या’ फंडाने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

हा उपक्रम बँक ऑफ इंडियाच्या सरकारी व्यवसाय पोर्टफोलिओचा विस्तार, डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग, संस्था तसेच नागरिकांसाठी तंत्रज्ञानाधारित पेमेंट सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देतो.

डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा

बँक ऑफ इंडिया या उपक्रमाकडे सरकारी व्यवसाय क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहत आहे. या सुविधेचा आपल्या ग्राहकांमध्ये आणि संस्थात्मक भागीदारांमध्ये प्रसार करण्यासाठी बँक प्रयत्नशील राहील. तसेच सरकारी महसूल संकलन, डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा वितरण यांना अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातील संधींचाही शोध घेईल.

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बँक ऑफ इंडियाने कोणासोबत भागीदारी केली आहे?

    Ans: बँक ऑफ इंडियाने भारत सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतकोष (NTRP) पोर्टलसोबत सहकार्य सुरू केले आहे.

  • Que: भारतकोष पोर्टलचा उपयोग काय आहे?

    Ans: भारतकोष पोर्टलद्वारे नागरिक, व्यवसाय आणि संस्थांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांचे शुल्क, दंड आणि इतर बिगर-कर महसूल ऑनलाइन भरता येतो.

  • Que: या भागीदारीत बँक ऑफ इंडियाची भूमिका काय असेल?

    Ans: बँक ऑफ इंडिया अधिग्रहणकर्ता (Acquirer) म्हणून आपल्या पेमेंट गेटवेद्वारे डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

Web Title: Bank of india bharatkosh partnership digital government payments rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Bank of India
  • Digital Payment
  • Government
  • online payment

संबंधित बातम्या

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!
1

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.